अंगणवाडीच्या अंगणात राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण !

पाडळी रांजणगाव दर्या मळा अंगणवाडीत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा !
पारनेर प्रतिनिधी :-
शारीरिक बौद्धिक विकासाचा समन्वय साधून तीन ते सहा वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या बालवाडीत मुलांचा शैक्षणिक पाया एक प्रकारे भक्कम केला जातो. हसत खेळत बागडत शिक्षणाचे धडे देणाऱ्या पाडळी रांजणगाव येथील दर्या मळा अंगणवाडीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या माध्यमातून बालवयातच मुलांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाचे बीज रुजवण्यात आले. यानिमित्ताने सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थी हे शिक्षकाचे प्रतिकृती,शिक्षक शाळेची प्रतिकृती आणि शाळा त्या गावची प्रतिकृती असते. अंगणवाडी ही पूर्वप्राथमिक शिक्षणाचे अंगण असते. त्यामध्ये मुलं रुपी डोळ्यांनाघालण्याबरोबरच आकार आणि वळण दिले जाते. त्यांना शिक्षणाची गोडी लावली जाते त्याचबरोबर शिक्षणाची पायाभरणी अंगणवाडीतच होते. त्याच्यावर भविष्यात करियर चे वेगवेगळे इमले उभे राहतात. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना बौद्धिक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम केले जाते. हसत खेळत त्याचबरोबर बागडत अनौपचारिक शिक्षण दिले जाते. पाडळी रांजणगाव येथील दर्या मळा अंगणवाडीचा दर्जा अत्यंत चांगला आहे. संपूर्ण तालुक्यांमध्ये अग्रेसर असणारी ही बालवाडी आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत दर्या मळा येथे गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सुरू आहे. खाजगी शिक्षण संस्थांचा बोलबाला आणि इंग्रजीच्या फीवर मध्येही एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या या अंगणवाडीमध्ये अनेक विद्यार्थी पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी येतात. कारण येथे विद्यार्थ्यांचा सुरूवातीलाच पाया पक्का होतो. त्याचबरोबर सर्वांगीण विकास सुद्धा होतो. या पार्श्वभूमीवर वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
अंगणवाडीत गोपाळकाला!
अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा समारोप कृष्णा जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याने करण्यात आला. अंगणवाडी सेविका भारती उबाळे यांच्या पुढाकाराने भगवान श्रीकृष्णाच्या रासलीला रचण्यात आल्या. यावेळी मुलांनी कृष्ण, राधा त्याचबरोबर गोपिका आणि बालगोपाल यांची वेशभूषा केली होती. यानिमित्ताने अंगणवाडी परिसरात लहानशी दिंडी काढण्यात आली. त्याचबरोबर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पाडळी रांजणगाव चे सरपंच विक्रमसिंह कळमकर, उपसरपंच वैशाली देवराम करंजुले, चेअरमन डी.बी करंजुले, सोसायटी सदस्य आप्पासाहेब साठे, विठ्ठल साठे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विनायक करंजुले, ह .भ.प लक्ष्मण संभाजी करंजुले, भगवान साठे, संदीप उबाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यंदा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सुवर्ण महोत्सव दर्या मळा अंगणवाडीत साजरा करण्यात आला. या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यात आला. त्याचबरोबर घरघर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले. महिला व किशोरवयीन मुलींसाठी संगीत खुर्ची व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांसाठी चमचा लिंबू स्पर्धा संपन्न झाली. त्याचबरोबर वृक्षारोपण करून मुलांवर पर्यावरणात्मक संस्कार करण्यात आले. बाल विकास अधिकारी लोंढे व पर्यवेक्षिका संगीता बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका भारती उबाळे ,मदतनीस अर्चना साठे यांनी विशेष प्रयत्न करून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम यशस्वी केला