इतर

बाळासाहेब शिंदे यांचे आमरण उपोषण स्थगित नामस्मरण करत बैठा सत्याग्रह सुरु!

भांडवलशाही धोरणामुळे शासनाला शेतकरी आठवेना

– कॉ सुभाष लांडे


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेतकऱ्यांना मता पुरते वापरायचे अन् देशासह राज्यात भांडवलशाही विचाराचं राजकारण करून निवडणुका जिंकायच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणून बुजून डोळे झाक करायची हीच नीती देशासह राज्यात वापरल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट आहे.

एकीकडे अधिवेशनात प्रश्न मांडावा यासाठी शिंदे सारख्या युवकांना उपोषणाची वेळ येते. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने खेदाची गोष्ट आहे.शिंदे यांनी मांडलेल्या मागण्या रस्ता असून त्यात अधिवेशनात चर्चा होऊन मार्ग निघावा. अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या मनात आहे. असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष पाटील लांडे यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथे हनुमान मंदिरात बाळासाहेब शिंदे यांचे सुरू असलेले आमरण उपोषण सोडते वेळी त्यांनी शेतकऱ्यांना संबोधताना शासनाच्या भूमिकेवर कडाडून हल्ला केला. एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गोड गोड गप्पा मारायच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे चर्चा न करता भांडवलदारांच्या हिताची चर्चा घडवून भविष्याच्या राजकारणाची गणिते जुळवायची या राजकीय नीतीचा त्यांनी आपल्या शब्दात तीव्र निषेध केला. त्यानंतर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात व विधानसभा हिवाळी अधिवेशनात शेतकरी आत्महत्या ,शेतीमालाला योग्य हमीभाव, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती,शेतकऱ्यांवरील कर्जबाजारीच संकट, सरकारचे चुकीचे शेतीमाल आयात-निर्यात धोरण, शेतीमालाचे भाव अभावी होणारे नुकसान, शेतकऱ्यांना सोसावे लागणारे महागाईची झळ,शेतकरी वर्गातील युवकावर आलेल्या बेरोजगारीचा संकट व मानसिक संकट या शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर अधिवेशनात चर्चा करून ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी ०८ डिसेंबर २०२३ रोजी शिंदे बाळासाहेब सदाशिव हे नविन दहिफळ येथे हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषणास बसलेले होते आज उपोषणाच्या सहाव्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. सुभाष लांडे पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले,शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे नेते दत्ता फुंदे, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर, मजलेशहर येथील भारत महाराज लोढे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आमरण उपोषण स्थगित केले व यापुढे बैठा सत्याग्रह करणार असल्याचे उपोषण करते बाळासाहेब शिंदे यांनी जाहीर केले.

यावेळी बोडखेचे उपरपंच रामकिसन तुजारे, दिपक भोसले, कडुबाळ इथापे, संदिप इथापे, आनंद गांधी, नारायण गंवादे, नारायण गांवढे, शंकर शिंदे, कचरू इसारवाडे, भाऊसाहेब आर्ले, सतिष कणगरे, हरिष जायभाय पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेण्याची गरज
शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथे गेली सहा दिवसापासून शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडावा व त्यावर निर्णय घ्यावा या मागणीसाठी बाळासाहेब शिंदे यांनी उभा केलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी बळ दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्याला आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आता आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांची भविष्यातील प्रश्नही अधिक गंभीर होतील.

दत्ता फुंदे
स्वाभिमानी शेतकरी संघटना अहमदनगर


प्रतिनिधी निवडताना सामान्यांना प्राधान्य द्या
समाज कारणाच्या नावा खाली राजकारण्यांच्या पिढ्या पिढ्या त्याच लोकांना प्रतिनिधीत्व पहिजे त्यासाठी त्यांनी कधी शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या प्रश्नाला प्राधान्य दिले नाही. म्हणुन आता समाज कारणासह राजकारणात ज्यांना सामान्यांचे प्रश्न समजतात त्यांना पाठवा म्हणजे न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची वेळ येणार नाही.

मच्छिंद्र आर्ले
स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button