अहमदनगर

यशवंत पंचायतराज अभियानात संगमनेर पंचायत समिती तृतीय

संगमनेर प्रतिनिधी:

यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत सन २०२२-२३ अंतर्गत नाशिक विभागात संगमनेर पंचायत समितीला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.या बद्दल अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येते. नाशिक विभाग स्तरीय समितीने पंचायत समिती ला भेट देऊन सर्व विषयांची पडताळणी केली. सन २०२१- २२ च्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. यासाठी एकूण ४०० गुणांची प्रश्रावली निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये पंचायत समितीचे सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग, तसेच शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, विभाग तसेच शाक्षत विकास ध्येये अशा विविध विभागांची पडताळणी करून गुणांकन देण्यात आले. पंचायत समितीस 400 पैकी 328.42. एवढे गुणांकन प्राप्त होऊन नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे,जळगाव, नंदुरबार या पाच जिल्हयातील सर्व तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

महा आवास अभियानात संगमनेर तालुक्याने उत्कृष्ट यश संपादन केले आहे.तसेच सुसज्ज इमारत, डेमो हाऊस, वृक्षारोपण, इंटरनेट सुविधा, पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहे, महिला कक्ष इ सोयीसुविधा यामुळे पंचायत समितीचा चेहरामोहरा बदलल्याचे चित्र दिसून येत आहे. अधिकाधिक कामात पारदर्शकता व गतीमानता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. पंचायत समितीने आपली वेगळी व सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे. पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी अनिल नागणे यांच्या कार्यतत्परता व नियोजनबद्ध प्रशासन, अधिक लोकाभिमुख दृष्टिकोन, सामाजिक जाणीव , सहकार्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.

शासनातर्फे रक्कम रु ६ लक्ष, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्राप्त होणार आहे. पुढील महिन्यात पंचायत राज दिनी सदर पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात संगमनेर पंचायत समितीला सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी यांनी स्वत:ला झोकून देऊन काम केले आहे.आपली जबाबदारी पार पाडत असताना शासनाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहे.सामाजिक जाणिवेतून काम केल्याने हे यश मिळाले आहे.वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे.यापुढे अधिक लोकाभिमुख कारभार करत सामान्य जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जाईल.या यशात पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष सहभाग राहिला आहे..

अनिल नागणे ,

(गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button