नर्मदा परिक्रमा करणारी चिमुकली रासेश्वरीची गीनिज बुक मध्ये नोंद!

सभापती काशिनाथ दाते सर यांनी केला सन्मान
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पाबळ ता. पारनेर नर्मदा परिक्रमाची ३६०० किलोमीटर प्रवास पूर्ण करून परतणारी चार वर्षाची चिमुकली रासेश्वरी जाधव हिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. रासेश्वरी महाराष्ट्रातील एवढ्या कमी वयात पूर्ण करणारी पहिलीच मुलगी आहे. तिच्याबरोबर तिचे आई वडील ह.भ.प. रमेशनंद जाधव, ह.भ.प. अर्चनाताई जाधव(गिरी) व ह. भ. प. रामदास गोर्डे, ह. भ. प. सीताराम गायकवाड, ह. भ. प. शांताबाई गोर्डे, ह. भ. प. विमल गोर्डे, ह.भ.प स्वरमाला शिंदे यांनीही खडतर असणारी ३६०० किलोमीटर प्रवासाची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. १२ ऑक्टोबर पासून ओंकारेश्वर येथून या परिक्रमाची सुरुवात झाली होती. जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते या सर्वांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले होते.
यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले भगवान शंकराची जलस्वरूप असणारी कन्या नर्मदा मैया, अतिशय खडतर असणारा साडेतीन ते चार महिने पायी प्रवास करायचा, असेल त्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे, चार वर्षाची मुलगी ३६०० किलोमीटर प्रवास करू शकते, काय दैवी शक्ती तिच्यात आली असेल, परंतु हे एक आश्चर्यच आहे आणि म्हणून या रासेश्वरीने केलेली नर्मदा परिक्रमेची गीनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. परिक्रमा पूर्ण करणाऱ्या सर्वांचेच मी अभिनंदन करतो आणि त्यांचा सन्मान करण्याचे आपल्याला भाग्य मिळाले आपले सर्वांचे मनःपूर्वक कौतुक करतो. यावेळी ह भ प पांडुरंग महाराज गव्हाणे यांचे हरिकीर्तन आयोजित केले होते.
यावेळी रामदास भोसले, डॉ. भास्कर राव शिरोळे, शंकर शेठ म्हात्रे, संजय मते, कुंदन काका साखला, आरिफ पटेल, बाळासाहेब पुंडे, महेश शिरोळे, सखाराम कवडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष कापसे, शिवराज कदम, भाऊसाहेब कवडे, लक्ष्मण मामा गोरडे, पोपट महाराज गोरडे, माजी सरपंच राजेंद्र कवडे, रावसाहेब कवडे, किसनराव कवडे, साहेबराव कवडे, पोपटराव जाधव, संदीप पाचपुते, अजिंक्य पडवळ, भाऊसाहेब गोरडे, लक्ष्मण गोरडे, शंकरराव गोरडे, अशोक गोरडे, तुकाराम कवडे, अर्जुन डुकरे, सुनील भेंडे, दत्ता औटी, काका कावरे, जालिंदर गुंजाळ, पांडुरंग सोनवणे संजय औटी, आबाजी झावरे, सिताभाऊ कवडे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक आर. एस. कापसे सर यांनी केले तर कैलास कवडे यांनी आभार मानले.