अहमदनगर

पारनेर कारखाना जमीन गैरव्यवहार प्रकरणी 23 मार्च ला मंत्रालयात सुनावणी …!

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :


क्रांती शुगर चा नोटीस घेण्यास नकार …
प्रतिवादी यांना नोटीस बजावनी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती . त्यानुसार बचाव समितीचे पदाधिकारी क्रांती शुगर यांना नोटिस प्रत देण्यासाठी गेले असता त्यांनी नोटीस स्विकारण्यास नकार दिला . त्यामुळे नोटीस प्रत क्रांती शुगरच्या फलकावर चिटकवण्यात आली.


पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या २५ एकर जमीन अदलाबदल गैरव्यवहार प्रकरणी महसुल मंत्री यांच्या न्यायालयात २३ मार्चला सुनावनी ठेवण्यात आली आहे . याप्रकरणी पारनेर कारखान्याचे अवसायक राजेंद्र निकम , चेअरमन क्रांती शुगर , के . एम . निमसे दुय्यम निबंधक , तहसिलदार पारनेर , मंडळ अधिकारी निघोज व तलाठी देवीभोयरे यांना नोटिसा बजावल्या आल्या आहेत .
या गैरव्यवहाराशी संबंध असणाऱ्या वरील अधिकाऱ्यांनी गुरुवारी आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे .
अवसानातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची सुमारे पंचवीस एकर औद्योगिक बिगर शेती जमीन क्रांती शुगर अँड पॉवर यांना अवसायक राजेंद्र निकम यांनी बेकायदेशीरपणे अदलाबदल करून दिलेली आहे. याप्रकरणी कारखाना बचाव समितीने आक्षेप घेऊन औरंगाबाद खंडपीठात खटला दाखल केला होता . उच्च न्यायालयाने महसूल विभागाला याबाबतचा उचीत निर्णय घेण्याचे आदेशित करण्यात आले होते . त्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे . पारनेर साखर कारखाना उभा असलेली सुमारे दहा हेक्टर (औद्योगिक बिगरशेती ) जमीन क्रांती शुगर अँण्ड पॉवर यांना राज्य सहकारी बँकेने विक्री केलेली नव्हती . त्यानंतर क्रांती शुगर यांनी पारनेरचे अवसायक राजेंद्र निकम यांना हाताची धरून या जमिनीचे बेकायदेशीर अदलाबदल केले होते. अवसायक यांच्या कामकाजाची मुदत जुन २०१५ ला संपल्यानंतर , अवसायक यांनी २०१९ रोजी हा अदलाबदल व्यवहार करण्यावर कारखाना बचाव समितीने आक्षेप घेतला होता . या जमीन अदलाबदलीच्या प्रकरणात मोठा गैरव्यवहार दडलेला असल्याचे पुरावे कारखाना बचाव समितीने न्यायालयात सादर केले होते .
या गैरव्यवहामुळे पारनेर कारखान्याचे अतोनात नुकसान झालेले असल्याचा दावा कारखाना बचाव व पुर्नजीवन समितीने केला आहे .

हा अदलाबदलीचा व्यवहार फेब्रुवारी २०१९ रोजी दुय्यम निबंधक पारनेर कार्यालयात नोंदवण्यात आलेला होता . या प्रकरणी अवसायक राजेंद्र निकम , दुय्यम निबंधक , क्रांती शुगर , तहसीलदार पारनेर ,मंडळ अधिकारी निघोज , तलाठी देवीभोयरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याने त्यांना याबाबत आपले म्हणणे सादर करण्यास आदेश देण्यात आले आहेत. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अवसायक व इतर अधिकारी दोषी असुन त्याद्वारे महसुल अधिकारी यांनी घेतलेल्या संबंधित फेरफार नोंदी रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे . अशी माहिती पारनेर कारखाना बचाव व पुर्नजीवन समितीने दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button