आविष्कार स्पर्धेमध्ये राजापूर महाविद्यालयातील विद्यार्थिनीची सुवर्ण कामगिरी……..

संगमनेर-प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय राजापूर शैक्षणिक वर्ष 2023 -24 मध्ये आयोजित अविष्कार कॉम्पिटिशन झोनल लेवल दिनांक 31/10/2023 रोजी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय विळद घाट , अहमदनगर या ठिकाणी आयोजित केली होती .
त्यामध्ये राजापूर महाविद्यालयातील एस वाय बी एस सी मधील कीर्ती निकम या विद्यार्थिनीने उत्कृष्ट पद्धतीने प्रोजेक्ट सादर केला त्यामध्ये धिंग्री आळिंबीचे नैसर्गिक गुणधर्म त्यामधे असलेले प्रथिने , कर्बोदके कशा प्रकारे वाढतील यावर आधारित प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन मध्ये केले.
या अविष्कार स्पर्धेसाठी महाविद्यालयातील अविष्कार कॉर्डिनेटर प्राध्यापक सुभाष वर्पे यांनी अथक प्रयत्न करून प्रोजेक्ट करून घेतला. महाविद्यालयातील सर्व विभागातील प्राध्यापकांनी देखील यासाठी प्रोत्साहन दिले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग सर यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले, तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड. अनिल गोडसे , उपाध्यक्ष आर पी.हासे , सेक्रेटरी ॲड.कैलास हासे यांनी सदर उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.