माका येथे विशाल निरंकारी सत्संग समारोह सम्पन्न

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील माका येथे विशाल निरंकारी
सत्संग समारोह संपन्न झाला. निरंकारी बाबा हरदेव जी
महाराज यांचे स्मृती दिनाचे औचित्य साधून समर्पण दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्य प्रवचनातून प.आ. महात्मा धिरज जी भोसले महाराज (पाटोदा) यांचे सुश्राव्य वाणीद्वारे भाविकांनी भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला.
आपल्या प्रवचनातून बोलताना धिरज महाराज म्हणाले की, सद्गुरू हे कुणा देहाचे नाव नसून परमात्म्याच्या ज्ञानाच नाव सद्गुरू आहे. मनुष्य जीवनात ज्ञान प्राप्ती शिवाय भक्तीला प्रारंभ होत नाही. त्यासाठी भक्तीच्या वाटेवर मार्गदर्शक
म्हणजेच सद्गुरू ची आवश्यकता आहे. निरंकारी बाबा हरदेव जी महाराज यांनी सद्गुरू रुपात प्रगट होऊन छत्तीस वर्ष संपूर्ण विश्वात एकत्वाचा आणि विश्वशांती चा संदेश दिला. माणसाला माणसाशी जोडण्याचे कार्य आज विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज करत आहेत. अनोको धर्म ग्रंथांची आणि संतांची दाखले व प्रमाण देऊन श्रोत्यांना ईश्वरी ज्ञानाबद्दल समजावून सांगितले.

या सत्संग कार्यक्रम प्रसंगी शेवगाव पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक विलासजी पुजारी साहेब, माका गावचे
सरपंच अनिल घुले, वि.का.सोसायटीचे चेअरमन रेवन्नाथ
पागिरे, उद्योजक दिपक पालवे, पत्रकार बन्सीभाऊ एडके
तसेच नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील अनेक
भाविक उपस्थित होते. संत निरंकारी मंडळ सोनई शाखेचे
प्रमुख विठ्ठलजी खाडे महाराज यांनी सूत्रसंचालन केले.
निरंकारी सेवादलाने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.
माकाचे बाळासाहेब डमाळे यांनी आभार व्यक्त केले. सत्संग कार्यक्रम समाप्तीनंतर सर्वाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.