नगर जिल्हातील अनाधिकृत पिरबाबा ,दर्ग्याचे अतिक्रमण न काढल्यास मनसेचा बुलडोजर चालवु~मनसे नेते अविनाश पवार.

दत्ता ठुबे
पारनेर:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांनी जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्यासाठी वेळो वेळी महाराष्ट्रातील जनतेसाठी समाज हिताचे मोठ मोठी कामं अल्पावधीतच करुन तमाम मराठी माणसाचा विश्वास संपादन केला असुन राज साहेब यांच्या सुचक वक्तव्यानुसार पक्ष जास्त काळ सत्तेपासून दूर रहानार नाही याचे चिञ पाडव्याच्या मेळाव्यातुन स्पष्ट झाले असुन राज साहेबांनी पाडव्याच्या मेळाव्यात अातापर्यंतच्या कामाचा पारदर्शी लेखाजोखा जनतेसमोर सादर केला राज्यातील सत्ताधारी विरोधकांना सुचक सल्लेही देण्यात आले त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला. राज साहेबांच्या भोंगा मुक्ती आंदोलनानंतर अनाधिकृत पिर बाबा दर्गा यावर बुलडोजर चालवण्याचे आदेशही प्रशासनाला,सरकारला देण्यात आले महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र सैनिकांनी भोंगा मुक्ती आंदोलनानंतर अनाधिकृत पिर बाबा दर्गा हटाव या मोहिमेमध्ये सहभागी होताना दिसत असुन नगर जिल्हा महाराष्ट्रात विस्ताराने मोठा असुन जिल्हात अनेक ठिकाणी अनाधिकृत पिर बाबा दर्ग्याचे वाढते प्रमाण घातक असुन जिल्हातील नागरिकांनी अशा अनाधिकृत पिरबाबा दर्ग्याविषयीची माहिती प्रशासनाला देऊन कार्यवाही न झाल्यास मनसे पदाधिका-यांना संपर्क साधावा. प्रशासनाने टाळाटाळ केल्यास अनाधिकृत पिर बाबा दर्ग्यावर मनसेचा बुलडोजर चालवण्यात येइल याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी असे नगर जिल्ह्याचे मनसे नेते अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले .