कत॔व्यभावना व विद्यार्थीनिष्ठेने केलेल्या कार्याचे फलीत म्हणजेच सेवापूर्ती काय॔क्रम…!कुलप्रमुख श्री.भाऊसाहेब खरसे.

राजूर प्रतिनिधी
शासकीय आश्रम शाळा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करीत घडलेल्या श्रीम.सोनाबाई धिंदळे यांचे जीवन संघर्षमय राहिले. मात्र येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला संधी मानून त्यावर मात करून आदिवासी विकास विभागाच्या आदश॔ आश्रमशाळा विद्यालयाच्या रोपट्याचे संगोपन करीत त्याचे वटवृक्ष फुलाविलण्याचे श्रेय .सोनाबाई धिंदळे यांच्याकडे जाते असे गौरव उदगार सोनाबाई धिंदळे यांच्या सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.भाऊसाहेब खरसे यांनी व्यक्त केले.
आपल्या भाषणात श्री.खरसे पुढे म्हणाले की, कर्तुत्वनिष्ठ, शिस्तबद्ध जीवन शैली, मनमिळावू, व्यक्तीमत्वाच्या श्रीम.धिंदळे यांचे काय॔ आश्रम शाळा कर्मचाऱ्यांंना सदैव प्रेरणादायी ठरेल आशी भावना श्री.खरसे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भानुदास राऊत, प्रभाकर राऊत व महादु कवठे हे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे कुलप्रमुख हे होते.येथील आदश॔ आश्रम शाळा भंडारदरा कॅम्प मवेशी या विद्यालयाच्या कर्मचारी श्रीम.सोनाबाई धिंदळे यांच्या सेवापुर्तीनिमित्ताने शैक्षणिक संकुल मवेशी येथील आदश॔ आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यातर्फे गौरव व कृतज्ञता सोहळा मंगळवार दि.28 मार्च रोजी विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनींच्या स्वागतगीत व मान्यवरांचे हस्ते सरस्वती पुजनाने झाली. कार्यक्रमात आदिनाथ सुतार आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले की आश्रमशाळेतील कर्मचारी त्याचे विद्यार्थ्यांप्रती असणारा सेवाभाव सदैव निभावत आलेआहेत. आपल्या कौटुंबिक समस्यां बाजुला ठेवुन सदैव कार्यतत्पर राहुन मुलांच्या प्रती आपले ऊत्तरदायित्व पार पाडत आले आहेत. हा सेवाभाव श्रीम.सोनाबाई धिंदळे यांनी आपल्या कार्यातुन दाखवून दिला असल्याचे मत सुतार यांनी आपल्या भाषणात शेवटी व्यक्त केले. कार्यक्रमात शिवराज कदम, एकलव्यचे प्राचार्य डॉ.देवीदास राजगिरे यांनीही आपल्या प्रमुख भाषणात श्रीम.सोनाबाई धिंदळे यांच्या कार्याचा गौरव केला .श्री.भानुदास राऊत श्री.प्रभाकर राऊत,श्री. धोंडू भांगरे, पोलिस पाटील
श्री.महादू कवटे,श्री. रामजी भाऊ भांगरे,श्री.सखाराम भांगरे,श्री.शाम इरनक,श्री.साळू कोंडार,श्री.लक्ष्मण बांडे,श्री.यमाजी कोंडाजी भांगरे श्री.रामनाथ भांगरे,सौ.आशा बांबळे सौ.सविता कोंडार यांनीही श्रीम.धिंदळे यांच्याविषयी गौरव ऊदगार काढले .श्रीम.धिंदळे या सेवाभावी वृत्तीचे कार्य, आश्रमशाळेत कर्मनिष्ठेने व कर्तव्यद्क्षतेने श्रेष्ठत्तम सेवा देत राहिल्या आहेत. आपले व्यक्तित्व म्हणजे काम हाच परमेश्वर मानले. गरिबीतून संघर्षमय जीवन जगत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विकास साधला. नियोजनबद्ध काम, सचोटी, मनमिळावू , कर्तृत्ववान अशी त्यांची गुणवैशिष्टे, एक आदर्श स्त्री, कुटुंब, सामाजिक व धार्मिक कार्य, इतरांना मार्गदर्शन करणे आपुलकी, जिव्हाळा विद्यार्थीनिष्ठा यामुळे श्रीम.सोनाबाई धिंदळे विद्यार्थीप्रिय होत्या, असे गौरव उदगार उपस्थित मान्यवरांनी या सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले.

आश्रमशाळेतर्फे सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीमती.धिंदळे यांचा भेटवस्तू,साडी, शाल, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील गावातील विविध पालक,नातेवाईक, सामाजिक, राजकीय व्यक्तींनी स्वतंत्रपणे सत्कार केला. यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करीत भावी जीवनासाठी श्रीम.धिदळे यांना शुभेच्छा दिल्या.कर्मचारी यांनी सेवानिवृत्त नंतर काही संपत्ती राखून ठेवली पाहिजे व त्याचा उपयोग सेवानिवृत्तीनंतरच्या आपल्या आकांशा पुण॔ करण्यासाठी वापरायला हवी.असा महत्वपूर्ण संदेश दिला.सत्कारमूर्तीना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
या सेवापुर्ती सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्तीं यांनी शासनाच्या आश्रम शाळेतील 36 वर्षातील अनेक कटु-गोड आठवणींना उजाळा देऊन कर्मचाऱ्यांचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी एकलव्य रेसिडेन्सियल पब्लिक स्कुल,मवेशी आश्रमशाळा, इंग्रजी माध्यम आश्रमशाळा येथील सर्व कर्मचारी तसेच संतोष गायकर,स्वप्नील सोनवणे,वाकचौरे सर ,दत्तात्रय बारामते,अधिक्षक समाधान सुय॔वंशी, बुद्धभुषण भामरे, शालकराम यादव,रंजना जगधने,शेटे मॅडम, भारती भोकरे,मेघना खेडकर तसेच शैक्षणिक संकुल मवेशी येथील सव॔ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, श्रीम.धिंदळे यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक विद्यार्थी आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन श्रीम.धिदळे यांचे जावई संजय भांगरे यांनी केले तर प्रास्ताविक श्री.समाधान सुर्यवंशी यांनी .तर सूत्रसंचालन श्री. जगन्नाथ जाधव यांनी केले. तर मान्यवरांचे आभार शेवटी संतोष गायकर सर यांनी मानले .
