आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२१/०३/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ३० शके १९४७
दिनांक :- २१/०३/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३४,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३९,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर वंसतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २३:५७,
नक्षत्र :- अश्विनी समाप्ति २४:३८,
योग :- ऐंद्र समाप्ति १९:०१,
करण :- तैतिल समाप्ति १३:१५,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ.भा.,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०७प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:३५ ते ११:०६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:०४ ते ०९:३५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०७ ते ०३:३८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
गौरी तृतीया(तीज), सौभाग्य शयनव्रत, गोरी शंकराचा दोलोत्सव, मन्वादि, श्रीराम दोलोत्सव,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ३० शके १९४७
दिनांक = २१/०३/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
जवळचा प्रवास करावा लागेल. कामाची काहीशी धांदल राहील. वैचारिक स्थिरता जपावी. आवडी-निवडी वर अधिक भर द्याल. मनाची चंचलता थांबवावी.
वृषभ
वाणीत मधुरता ठेवाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन फॅशनचे कपडे खरेदी कराल. आनंदी दृष्टीकोन ठेवून वागाल.
मिथुन
मनाची चलबिचलता रोखावी लागेल. अति विचार करणे टाळावे. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. हातातील कामाचे योग्य नियोजन करावे. फार पसारा वाढवून घेऊ नका.
कर्क
चांगला व्यावसायिक लाभ होईल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. जिथे जाल तिथे आनंद वाटाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
सिंह
कामाचा दर्जा सुधारेल. घराची उत्कृष्ट सजावट कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. आपल्या बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल.
कन्या
मनाची विशालता दाखवाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल. सर्वांसमोर तुमची कला सादर करता येईल. गायन, वादन कलेला पोषक वातावरण लाभेल. धार्मिक कामात हातभार लावाल.
तूळ
शेअर्सच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून वागाल. कमी श्रमात कामे पार पडतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. प्रलोभनापासून दूर राहावे.
वृश्चिक
शांतपणे विचार करावा लागेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्याल. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल. कर्तव्यदक्षता चांगल्या पद्धतीने पाळाल.
धनू
उगाचच खट्टू होऊ नये. आपले गुण सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.
मकर
नाटक-सिनेमा पाहण्याचा बेत आखाल. दिवस मौजमजेत घालवाल. कलात्मक दृष्टीने वागणे ठेवाल. काहीसा व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ
समाधानी वृत्ती ठेवून राहाल. घराची स्वच्छता काढाल. बागबगीच्यात रमून जाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. घरात सर्वांशी प्रेमाने वागाल.
मीन
निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. वाचनाची आवड पूर्ण करता येईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन गोष्टी शिकून घ्याल. नातलगांशी सलोखा वाढेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


