इतर

आमदार लंकेंच्या वाढदिवसाचे निमित्ताने १६७ दिव्यांग व अपंग बांधवांना प्रमाणपत्र वाटप!


दत्ता ठुबे/पारनेर – प्रतिनिधी
शासनाच्या विविध सोयी सुविधा व सवलतीचा लाभ मिळावा यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान व निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक तालुक्यातील १६७ दिव्यांग व अपंग बांधवांना शासकीय प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे. मंगळवारी पारनेर येथील आनंद मंगल कार्यालय मध्ये या प्रमाणपत्राचे वाटप आमदार निलेश लंके यांनी या दिव्यांग व अपंग बांधवांना केले असून या बांधवांची ससेहोलपट यामुळे थांबले आहे. तर दुसरीकडे शासनाच्या वतीने हे प्रमाणपत्र मिळाल्याने ज्या विविध शासकीय योजना व अनुदान आहे त्याचा फायदा सुद्धा या अपंग व दिव्यांग बांधवांना होणार आहे. निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष सुनील करंजुले अॅड सुनीता घोडके उज्वला वाळेकर सुमन बाबर ज्योती पाठक राजेंद्र भुजबळ गौतम आढाव संतोष जाधव संदीप पुंडे तुळशीराम जाधव शिवा कराळे यांनी या विशेष शिबिराच्या आयोजन करून अपंग बांधवांना मदतीचा हात दिला आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते किसनराव रासकर अशोक सावंत तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे नगराध्यक्ष विजय औटी दिपक लंके खंडु भुकन मारूती रेपाळे राहुल झावरे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर माजी सभापती सुदाम पवार कारभारी पोटघन मेजर बा.ठ.झावरे दिपक लंके दादा शिंदे रा. या औटी श्रीकांत चौरे डॉ. बाळासाहेब कावरे बबलू रोहकले विजय पवार सचिन पठारे किरण पठारे अनिल गंधाक्ते भागुजी दादा झावरे सखाराम औटी भाऊसाहेब भोगाडे सर बाळासाहेब पुंडे महेंद्र गायकवाड उपस्थित होते.
जिल्हा शासकीय रुग्णालयात जर बुधवारी या अपंग व दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येते परंतु पारनेर तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक दिव्यांग व अपंग बांधवांना त्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची वेळ येत होती. तर अनेक दिव्यांग अपंग बांधव या शासकीय प्रमाणपत्रापासून वंचित असल्याने आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले व पंधरा दिवसाच्या कालावधीतच पारनेर तालुक्यातील १६७ दिव्यांग अपंग बांधवांना ही प्रमाणपत्र मिळून दिले आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी लपून राहिला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button