वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तर ची भेट

राजूर येथील कानकाटे परिवाराचा उपक्रम
राजूर प्रतिनिधी
आज बुधवार दिनांक 29 3 2023 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगाव येथे मातोश्री उद्योग समूहातील श्री किरणशेठ कानकाटे व कानकाटे परिवार यांच्याकडून आपल्या वडिलांचे अकरावे पुण्यस्मरणानिमित्त पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर साहित्य भेट देण्यात आले
ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली ,अतिशय सुंदर, तालासुरात विद्यार्थ्यांनी ईश स्तवन पाहुण्यांसमोर सादर केलं, याप्रसंगी सरपंच, सुरेश पथवे उपसरपंच अंकुश महाले ग्रामपंचायत सदस्य खंडु मेंगाळ,सामाजिक कार्यकर्ते अजय कुमार महाले,सावराव गिर्हे विकासराव आरोटे मारुती भुतांबरे स्थानीक स्कूल कमिटी अध्यक्ष उद्धवराव आरोटे, जगन्नाथ मुतडक , गणेश महाले, मेजर, संदेश मुतडक, मनोहर पथवे चंद्रकांत भूतांबरे ,निवृत्ती पथवे व बहुसंख्य ग्रामस्थ व कानकाटे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला, अतिशय गोड कार्यक्रमात .राजूर गावचे मा. उपसरपंच श्री गोकुळ शेठ कानकाटे यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक जाणिवेतून आपण कुणाचे तरी देणं लागतो, यातून सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेल्या वडिलांच्या स्मरणार्थ,30 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर ( सेक)व दोन्ही वर्गात फॅन देऊन भविष्यात सुद्धा आमचे कानकाटे परिवाराकडून निश्चित शाळेसाठी मदत केली जाईल आणि वडिलांच्या कार्याचा वसा जोपासला जाईल , स अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये योगदान देऊ असं मत व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री तबाजी सुपेसर व श्री महादू शेळके सर यांनी मोलाचे सहकार्य केले .
