शहाजी पाटील पारनेर करांवर फिदा !
पारनेर प्रतिनिधी :
शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंडूशेठ रोहोकले यांचे तालुकाभर प्रभावी नेतृत्व असल्याची जाणीव आपणास पारनेर मतदारसंघात आल्यापासूनच झाली असून पुढील काळात माझ्यासह राज्य सरकारची ताकद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणार असल्याचे सांगत बंडूशेठ … एकदम ओक्के ! अशा शब्दात आमदार शहाजी बापू पाटील यांनी विकास रोहोकले यांचे कौतुक करून पाठबळ दिले.
सांगोल्याचे आ. पाटील हे सोमवारी पारनेर तालुका दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याचे संपुर्ण नियोजन तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांच्याकडे होते. राळेगण फाटा, पारनेर , कर्जुले हर्या, टाकळी ढोकेश्वर, धोत्रे येथे आ. पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. रोहोकले यांच्या या नियोजनावर बापू खूश झाले.
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले की, विकास रोहोकले यांच्या पाठीशी सर्व राजकीय ताकद देणार असून हा तालुका शिंदे गटाचा बालेकिल्ला होण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असल्याचे सांगत जिल्हयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीतr सर्वसामान्यांच्या हिताचे काम तालुकाप्रमुख रोहोकले हे करीत असतात याकामी त्यांना सर्वतोपरी मदत करावी असेही आमदार पाटील यांनी सांगितले.