छ्त्रपती संभाजी महाराज सृष्टी साठी जागा राखीव करा : आ.चेतन विठ्ठल तुपे

पुणे प्रतिनिधी
हडपसर चे दमदार आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांनी पुरंदर येथे छ्त्रपती संभाजी महाराज सृष्टी साकारण्यासाठी आ.संजय जगताप यांनी दिलेली जमीन राखीव करण्यात यावी अशी मागणी सभागृहात केली.
पुरंदर किल्ला हे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ. पुरंदर हवेलीचे आमदार मा.श्री. संजय जगताप यांनी किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात चिवेवाडी येथे १६ एकर जमीन छत्रपती संभाजी महाराज सृष्टी व्हावी यासाठी दिली आहे. ही अभिमानास्पद बाब असल्याचे आ.चेतन तुपे यांनी सांगितले.
विकास आराखड्यात ही जमीन छत्रपती संभाजी महाराज सृष्टीसाठी राखीव असल्याचा उल्लेख करण्यात यावा. अशी आ.संजय जगताप यांनी मागणी केली आहे. आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी सभागृहाला विनंती केली आहे की आ.जगताप यांच्या या मागणीची दखल घेऊन स्वराज्यरक्षक छ्त्रपती संभाजी महाराज सृष्टी लवकरात लवकर साकारण्यात यावी.