पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता जनजागृती!

मुंबई दि31पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती – कामोठे – विभाग यांच्या मार्फत दि. ३१/०३/२०२३ रोजी स्वच्छता उत्सव २०२३ सकाळी ७.३० पासून अभियान राबविण्यात आले
या मोहिमेचा मुख्य उद्देश महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग तसेच महिलांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेमध्ये झालेले बदल साजरे करणे या साठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आशा सेविका, प्राथमिक आरोग्य परिचारिका, सर्व शाळा, कॉलेज, एनजीओ, महिला बचत गट तसेच 1.आदिवासी विकास परिषद 2.दिशा महिला मंच 3. संस्कार महिला संस्था 4. सरस्वती महिला बचत गट 5.M.G.M मेडिकल कालेज 6. रॉबिनहुड आर्मी 7. प्राथमिक आरोग्य केंद्र कमोठे 8. आशा स्वयं सेविका समाविष्ट करून स्वच्छतेच्या बाबत व्यापक जनजागृती करून रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला.
सदर अभियानामध्ये महिला बचत गटाचे २० स्टॉल लावण्यात आले आहे या अभियानात अंदाजे २२५ महिला उपस्थित होत्या याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.गणेश शेटे साहेब तसेच लेखा अधिकारी श्री.संग्राम व्होरकाटे साहेब यांच्या मार्फत महिला सर्व स्वच्छता कॅप्टन ला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्या ठिकाणी प्रभाग समिती क चे प्रभाग अधिकारी श्री.अरविंद पाटील साहेब आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड साहेब, आरोग्य विभाग इंजिनिअर चिन्मय सापने साहेब स्वच्छता निरीक्षक योगेश कस्तूरे , ऋषिकेश गायकवाड़, आतुल वास्कर , मिथुन पवार व सर्व पर्यवेक्षक, आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते