वीज ऊद्योगातील कंत्राटदार तुपाशी, कंत्राटी कामगार उपाशी!

04 / 01 / 2023
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी वेळ मिळेना!
पुणे प्रतिनिधी
मागील 3 वर्षात ऊर्जा विभागातील वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक प्रलंबीत गंभीर समस्यां सोडवण्यासाठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न वीज कंत्राटी कामगार संघ प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडी सरकार काळात अडीच वर्षे मा.नितीन राऊत व आता 6 महिने .ना.देवेंद्रजी फडणवीस ऊर्जामंत्री यांना अनेकदा भेटुन देखील संघटनेला चर्चेसाठी वेळ दिला जात नसल्याने कंत्राटदार तुपाशी वीज कंत्राटी कामगार उपाशी अशी ऊर्जा विभागातील दाहक व सत्य परिस्थिती निर्माण झाली आहे
प्रलंबित प्रश्ना बाबत लवकरच बैठक आयोजित करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केली आहे.
.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री ,गृहमंत्री ऊर्जामंत्री अशी एकूण 8 महत्वाची खाती आहेत अनेकदा भेटुन देखील त्यांनी भारतीय मजदूर संघाला चर्चेसाठी वेळ दिला नसल्याने उर्जाविभागातील अंदागोंदी कारभाराला समोर मांडायला संघटनेला योग्य जागा मिळत नाही.
कामगारांना दैनंदिन जीवनात वेतन वेळेवर व पूर्ण न देणे, बोनस न देणे, PF व ESIC न भरणे, जाणीवपूर्वक बदल्या करणे, जुन्या व अनुभवी कामगार व पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक कामावरुन कमी करून त्यांच्या जागी नवीन कामगार भरताना त्यांच्या कडून हस्ताकांच्या मार्फत हजारो रुपये खंडणी स्वरूपात घेणे इत्यादी मुळे कामगार त्रस्त आहेत.
शासनाने अनेक सवलती दिल्याने सुशिक्षित बेरोजगार संस्था या गोंडस नावाखाली वीज उद्योगातील काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अशा बोगस संस्था स्थापन केल्या व कंत्राटी कामगार पुरवण्याची कंत्राटे स्वतः घेतली आहेत.
कामगारांच्या हिताचे रक्षण करणे हे संघटनेचे काम असते इथे मात्र या संस्थाचालकांनीच कामगारांचे आर्थिक दृष्ट्या शोषण करणे मनमानी पद्धतीने कारभार सुरू केले आहे. या कार्यात अनेक अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबध असल्याचा संशय आहे. त्यामुळे याची सहकार व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागा मार्फत सखोल चौकशी करून अशा पद्धतीने कंत्राटे देणे आता प्रशासनाने बंदच केले पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ऊर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासनाकडे करणार आहे.
मागील सरकारने पुर्णपणे निक्रीयता दाखविल्यामुळेच कामगारांचे प्रश्न प्रलंबितच राहीले होते आता सरकार बदलून 6 महिने उलटले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री .ना देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगार संघटनेला दिलेल्या आश्वसनानुसार अद्याप मिटिंग न बोलावल्या मुळे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे संलग्न भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लवकर मिटिंग घेवून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) चे महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.