नांदूरपठार येथील विकास विद्यालयास ग्रीन इन्फ्रा कंपनीकडून अडीच लाख रूपये किंमतीचे दोन प्रोजेक्टर ची भेट .

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
व्यावसायिक व सामाजिक जबाबदारी निधीतून नांदूरपठार येथील विकास विद्यालयास ग्रीन इन्फ्रा या कंपनीकडून प्रत्येकी अडीच लाख रूपये किंमतीचे दोन प्रोजेक्टर भेट देण्यात आले.
दोन्ही प्रोजक्टरचा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासासाठी उपयोग होणार आहे. हे डिजीटल स्कुुल प्रोग्राम संच भेट दिल्याबद्दल कंपनीचे अधिकारी दिलीप पुंड, थानू पिल्ले यांचा विद्यालय तसेच ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप चौधरी, मा. सरपंच रविंद्र राजदेव, मा. सरपंच भानुदास आग्रे, व्हा. चेअरमन दत्ता देशमाने तसेच महेंद्र गायकवाड, सखाराम हनुमंत आग्रे, मुख्याध्यापक कपाळे, बाबाजी चौधरी, रामदास वलवे, यांच्यासह इतर शिक्षक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते संदीप चौधरी यांनी सांगितले की, व्यावसायिक व सामाजिक जबाबदारी निधी प्रत्येक कंपनीस खर्च करावा लागतो. ग्रीन इन्फ्रा ही कंपनी नांदूरपठार परिसरात काम करते. याच परिसरातील विद्यालयास त्यांनी विद्यालयासाठी हा निधी खर्च करून दोन प्रोजेक्टर भेट दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आपण कंपनी व त्यांच्या अधिकाऱ्यांप्रती ॠण व्यक्त करतो. नांदूरपठार हे गाव दुर्गम आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आहे. गावामध्ये सर्व सुविधा पुरविण्यासाठी आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून आपण व आपले सहकारी नेहमीच पुढाकार घेत असून आ. लंके यांनी आजवर कोटयावधींचा निधी उपलब्ध करून देत गावाला मुख्य प्रवाहात आण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध होउन हे विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून आपले कर्तुत्व सिध्द करतील असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला.