अकोल्यात भाजपाला सर्वाधिक जागा मात्र पिचड यांच्या साम्राज्याला धक्का

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला एकूण 45 ग्रामपंचायत पैकी 25 ग्रामपंचायती भाजपाकडे, 9 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे 10 ग्रामपंचायतीवर अपक्ष तर एका ग्रामपंचायती वर माकप ने झेंडा फडकविला आहे
तालुक्यातील राजुर ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड ,माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील सरपंच पदाच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला पिचड यांच्या राजूर ग्रामविकास मंडळा ।सरपंच पदाचे उमेदवार शोभा गणपत देशमुख यांच्या पराभव झाला तर आमदार डॉ किरण लहामटे यांच्या नेतृत्वात खालील राजूर विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार पुष्पाताई दत्तात्रय निगळे यांचा 19 मतांनी विजय मिळवून राष्ट्रवादी ने राजूर ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला राजूर ग्रामपंचायत वरील चाळीस वर्षा वर्षाच्या साम्राज्याला लहा मटे यांनी धक्का दिला त्यामुळे पिचड यांचा तालुक्यात गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली 17सदस्य संख्ये पैकी 11 जागां पिचड यांचे कडे तर 6 जागा लहामटे यांचे कडे आल्या

अकोले तालुक्यात माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ज्या ग्रामपंचायत वर झेंडा फडकवला त्या ग्रामपंचायती व सरपंच पुढील प्रमाणे–
म्हाळुंगी – मदन निवृत्ती मेंगाळ , सांगवी- मनिषा शांताराम मेंगाळ, केळी रूमनवाडी- मुरलीधर चिमा मेंगाळ , खिरविरे- गणपत नामदेव डगळे, मुथाळणे- सुनंदा अविनाश गावडे,
माळेगाव- चंद्रकांत तानाजी कोंदणी- चिमा सुनील भांबेरे, शिरपुंजे बुद्रुक- कांताबाई भाऊ धिंदळे, कोहंडी- हिराबाई पांडुरंग तातळे, चिंचवणे – अलका खेमा डगळे ,पाडाळणे- रोहिणी सुनील बगाड, अबितखिंड- यमुना दत्तात्रेय घनकुटे पळसुंदे- सुरेश महादू बुळे, फोपसंडी- सुरेश महादु काळे शेणित बुद्रुक- कोंडाजी गोविंद करवंदे पिंपरकणे- उषा प्रसाद पिचड, सावरगाव पाट – रामनाथ वाळीबा गावडे, टाहाकरी- चांगुना भाऊसाहेब मेंगाळ, टिटवी- तुकाराम गोविंद वायाळ, केळी कोतुळ- संजय लक्ष्मण दराडे केळी ओतुर- मीना दत्तात्रय वायाळ
राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकविलेल्या ग्रामपंचायती व सरपंच पुढील प्रमाणे
धामणवन- मनीषा पोपट चौधरी , मवेशी -हेमाजी भिवा भांगरे, रंनद बु- सुंदर हरी भोईर, लव्हाळी ओतूर- प्रकाश यमाजी लहामटे, केळुनगण- युवराज मुरलीधर देशमुख, पांजरे -रामचंद्र मताजी उघडे, उडदावणे – कीर्ती गोविंद गिर्हे , गोंदूशी -रत्नाबाई भाऊ हिले, राजूर- पुष्पां निगळे ,
माकपने ने समशेरपूर समशेरपुर ग्रामपंचायत वर कम्युनिस्टंचा झेंडा फडकवला आहे या ठिकाणी एकनाथ मेंगाळ हे विजयी झाले
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीवर अपक्ष सरपंच निवडून आले आहे यात
सातेवाडी केशव गोविंद बुळे विठे-कमलाबाई हिरामण में गाळ वारंघुशी फसाबाई निवृत्ती बांडे, मान्हेरे-सुनीता अजय गभाले ,करंडी ज्योती सुनील गोंदके ,कातळापूर- बाळू चहादू ढगे ,तेरूगंण मच्छिन्द्र देवराम कोकतरे, तळे- हौसीराम धोंडिबा वेडे, पाडोशी – दत्ता कुला ळ
