इतर

शेवगावात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा उत्साहात


शहराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
वीर सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात महत्वाचे स्थान मिळवले आहे. आजही भारतातील बहुसंख्य लोक त्यांना महान क्रांतिकारक म्हणून ओळखतात. परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की आजही काही लोक त्यांना सांप्रदायिक, कुटील आणि देशाचा शत्रू म्हणून संबोधित करतात. या महान क्रांतिकारच्या बाबतीत चुकीचा इतिहास लिहिला जाऊ नये, पुढच्या पिढीला त्यांच्याबद्दल व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सत्य माहिती मिळावी या उद्देशाने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेने संपूर्ण महाराष्ट्रात 30 मार्च ते 6 एप्रिल 2023 दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा आयोजित केली असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गौरव यात्रेचे आयोजन सकल हिंदू समाज, शेवगाव तालुका यांच्यावतीने आज शेवगाव येथे करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय घोषणा देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून गौरव यात्रेची सुरुवात झाली, सदर गौरव यात्रा क्रांती चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रगीत घेऊन समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ नीरज लांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, आमदार मोनिकाताई राजळे यांची भाषणे झाली.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू न शकणारे काही राष्ट्रीय नेते वीर सावरकरांबद्दल चुकीची माहिती देऊन धर्मा धर्मात द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहेत. यातून त्यांचा मनाचा कोतेपणा दिसतो, सावरकरांना कमी लेखणे म्हणजे सूर्यावर पांघरून घालण्यासारखे आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर काल ही श्रेष्ठ होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार, त्यांच्याबद्दल चुकीची माहिती देणाऱ्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत असे यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या.
यावेळी वसुधा सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हरीश शिंदे, जगदीश धूत, डॉ कृष्णा देहडराय, डॉ मल्हारी लवांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आशितोष डहाळे, मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, सुनील रासने, बापूसाहेब पाटेकर, रवींद्र सुरवसे, महिला आघाडी अध्यक्ष आशाताई गरड, उषाताई कंगनकर, रोहिणीताई फलके, वैशालीताई बाप्पू धनवडे, रंजनाताई धनवडे, सागर फडके, महेश फलके, नितीन दहिवाळकर, गणेश कोरडे, दिगंबर काथवटे, नितीन फुंदे,सुनीलसिंग राजपूत, भाऊसाहेब मुरकुटे, राजेंद्र डमाळे, केशव आंधळे सुगंध खंडागळे, पांडुरंग तहकीक, बाळासाहेब झिरपे, अंबादास ढाकणे, गंगा खेडकर, संजय खेडकर, लक्ष्मण काशीद, कल्याणमामा जगदाळे, मारुती भागवत, गोकुळ भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराज सागडे यांनी केले, आभार प्रा. नितीन मालानी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button