इतर

प्रियंकाताई शिंदे यांना मिळालेला पुरस्कार हा पारनेकरांचा गौरव -विद्याताई पवळे

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
नगर-पुणे महामार्गावरील सुपा एम आय डीसी मध्ये वर्ल्ड ऑफ वुड नावाने प्रियंकाताई शिंदे यांनी ओरीजनल सागवान डम्पोडेट खबर बुड लाकडापासुन स्टाईल मधे नविन,नविन डिझायनर बनवणारा कारखाना सुरु केला असुन अल्पावधितच उत्तम गुणवत्ता ठेवत मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे अल्पावधितच त्यांच्या कामाचा मोठा विश्वास निर्माण केल्यामुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद आज ग्रामीण भागात मिळत महीला उदयोजकता हे राष्ट्र उभारणीचे प्रभावी माध्यम असुन विद्याताई पवळे यांनी नारायणगव्हाणसह पंचक्रोशितील महिलांच्या हाताला काम मिळावे व महिला उद्योजकता वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहू व विकासाची गंगा ग्रामीण भागात उभी करण्यासाठी आपण लवकरच महीला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेवु यासाठी आपले मार्गदर्शन मोलाचे राहील असे सौ. प्रियंकाताई राहुल शिंदे यांच्याशी सौ. विद्याताई शरद पवळे यांनी सत्कार प्रसंगी बोलताना मत व्यक्त केले.यावेळी प्रियंकाताईंनी सोबत काम करण्यास आनंद वाटेल असे बोलत विद्याताईंना धन्यवाद व्यक्त केले.

दिल्ली या ठिकाणी सौ. प्रियंका ताई राहुल दादा शिंदे यांना आयकॉन ऑफ एशिया लीडर इन वुमन पुरस्कार देण्यात आला असुन आपल्या कामगिरीचा ठसा उमटवून आपला व्यवसाय एका विशिष्ट उंचीवर नेऊन इतर महिलांसाठी उद्योग क्षेत्रात प्रेरणादाई ठरलेल्या प्रियंकाताईंचा आदर्श शिक्षिका सौ.विद्याताई शरद पवळे यांच्याकडून यथोचित सन्मान करून सप्रेम भेट देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देवुन अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button