भानसहिव-यातील रेशन साठा, गुन्हा दाखल १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दत्तात्रय शिंदे
भानसहिवरा (ता नेवासा ) येथे नागरिकांनी पकडून दिलेल्या अवैधरित्या साठवणूक केलेल्या रेशनच्या ४०१ गोण्या धान्य साठ्याप्रकरणी तिघांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल नेवासा पोलीस ठाण्यात पुरवठा निरीक्षकानी फिर्याद दिली होती. १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
, नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे अवैधरित्या साठवून ठेवलेल्या गहू व तांदळाचा साठा शुक्रवारी नागरिकांनी पकडला. शनिवारी दुपारी नेवासा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक वैशाली विजयकुमार गंदीगुडे (वय ३६) यांनी फिर्याद दिल्यावरुन सुरेश दगडू
उभेदळ (रा. सुरेशनगर ता. नेवासा), किशोर ऊर्फ
संतोष सुदाम गोरे (रा. सुरेशनगर ता. नेवासा) व
संदीप सुभाष शिंदे (रा. भानसहिवरे ता. नेवासा) याचे गुन्हा दाखल केला आहे