काकनेवाडीकरांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार- आमदार लंके

— —
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
काकनेवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण, निलेश लंके प्रतिष्ठान चे अध्यक्ष, संभाजी पोपट वाळुंज,प्रतिष्ठानचे सदस्य कॉन्ट्रॅक्टर विनायक वाळुंज, आणी युवा कार्यकर्ते प्रदीप (बंटी वाळुंज )यांच्या अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमात मा. आमदार निलेशजी लंके बोलत होते.
काकनेवाडी गावाने आमदार होण्यापूर्वी आणि आमदार होण्यासाठी मला खूप सहकार्य करून आशीर्वाद दिले. त्यामुळेच मी तालुक्यात विकासाची गंगा आणू शकलो. काकनेवाडी गावाचा पंधरा वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची संधी मला सामान्य जनतेमुळे मिळाली. यामागील काळात मी ग्रामस्थांसोबत होतोच पन यापुढील काळातही काकनेवाडीकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन आमदारांनी दिले.
यावेळी अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून श्रीराम मंदिर सभा मंडप बांधणे 20 लक्ष, पाझर तलाव दुरुस्ती 28लक्ष अशा जवळपास 48लक्ष रुपये कामाचे लोकार्पण करण्यात आले.
गावात गटातटचा विचार न करता पात्र असणाऱ्या प्रत्येकाला वैयक्तिक योजने चा लाभ देणार
संभाजी वाळुंज
(अध्यक्ष निलेश लंके प्रतिष्ठान काकनेवाडी )

खोडा वस्ती रस्त्यासाठी 24 लक्ष रुपये मंजूर करन्यात आले होते परंतु तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्र लिहून निधी मागे पाठवला. म्हणून ते काम होउ शकले नाही. परंतु यापुढील काळात ग्रामपंचायत मध्ये समविचारी प्रतिनिधी असतील तर विकास कामाला अडथळा येनार नाही असे आमदार म्हणाले.

यावेळी काकनेवाडीचे माजी सरपंच पाराजी वाळुंज,बा.ठ.झावरे,अशोक शेठ कटारिया, राजेंद्र चौधरी,अशोक घुले,भोंद्रे गावचे सरपंच अभिषेक झावरे, सोसायटीचे संचालक पोपट तुकाराम वाळुंज, कान्हूर पठार सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक पोपट रेवजी वाळुंज, शम्भू राजे मित्र मंडळाचे अध्यक्ष गवराम शेठ वाळुंज, कान्हूर पठार पतसंस्थेचे संचालक भगवान शेठ वाळुंज, मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम वाळुंज,डॉ. मंगेश वाळुंज, दिलीप वाळुंज, माधव शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सूत्रसंचलन हभप प्रशांत महाराज यांनी तर आभार राजेंद्र झावरे यांनी मानले.