अंदरसुल येथील कुस्त्यां मध्ये पैलवान अजय सुरेश जावळे ची विजयी सलामी

डॉ. शेरूभाई मोमीन,
येवला /नाशिक
अंदरसुल ता. येवला सालाबाद प्रमाणे पवन पुत्र श्री. हनुमान जन्मोत्सव व श्री. बिरोबा महाराज यांच्या, यात्रा उत्सव निमिताने, आज अंदरसुल गावातील, ग्रामस्थ सर्व जुने नवे पंच मंडळ, सर्व गावकरी, भाविक भक्त मंडळ, सर्व पहिलवान यांच्या वतीने श्री. हनुमान जन्मोत्सव, व ग्राम दैवत श्री.बिरोबा महाराज यात्रौत्सवा निमित्त भव्य कुस्त्यांची विराट दंगल यामध्ये श्री. दत्त व्यायाम शाळा, सुंदरनगर येवला, येथील नामवंत पैलवान अखिल भारतीय, भारत केसरी रौप्य पदक विजेते, नाशिक जिल्हा कुस्तीगिर संघटनेचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते, पैलवान, सुरेश रतनजी जावळे यांचे सुपुत्र, पैलवान अजय सुरेशजी जावळे, व समोर श्री. जंगलीदास महाराज श्रम आखाडा अहमदनगर, येथील पैलवान या दोन्ही च्या, कुस्तीखेळा मध्ये , येवला येथील अजय सुरेश जावळे यांनी विजयी सलामी देऊन, विजयश्री प्राप्त केला, हि कुस्ती पहान्या साठी येवला तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, व कुस्ती शौकीन यांनी मोठ्या प्रमाणे, एकच गर्दी केली होती

, यावेळी कुस्ती आखाड्या, मध्ये, पंच म्हणून ,पैलवान जनाभाऊ, दत्ता काका सुराडे, गोरखनाथ शेंद्रे, सोमनाथ काका रोकडे, पैलवान शिवाजीराव धनगे, उद्योगपती लक्षमणराव वडालकर, तात्या शेंद्रे,यांनी काम पाहिजे, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, ज्येष्ठ नेते किसनराव धनगे, वडालकर सर, जगताप बाबा, संतोष केंद्रे, संजय भोसले, पैलवान सुरेश जावळे, स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, समीरभाई सैय्यद, मछिंद्र सोमनाथ रोकडे, आदीसह नेते गण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते, श्री. बिरोबा महाराज यात्रा उस्तव नियोजन समिती, व सर्व गावकरी मंडळ सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी मित्र परिवार, नव तरुण यात्रा उत्सव मंडळ यावेळी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.