केवळ पंचनामे नको, तात्काळ मदत द्या, आ. लंके यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी

आ. नीलेश लंके भल्या सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
रविवारी सायंकाळी तालुक्यातील वनकुटे, पळशी तसेच खडकवाडी येथे वादळी वारा, गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमधील उभ्या पिकांसह घरांची मोठया प्रमाणावर पडझड झाली. आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी सकाळी सव्वासहालाच शेताच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली.

रविवारी सायंकाळी विटा, खानापुर येथे आयोजित करण्यात ;आलेल्या बैलगाडा शर्यतीस आ. लंके यांनी हजेरी लावली होती. तेथून सोमवारी पहाटे साडेपाच वाजता हंगे येथे पोहचल्यांनतर चालकास सोडून दुसऱ्या चालकासोबत आ.लंके यांनी थेट वनकुटे गाठले. सव्वा सहाच्या सुमारास त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास सुरूवात केली. वनकुट्यात भागाराम पायमोडे या शेतकऱ्याचे चार एकर कांद्याच्या पिकाचा गारपिटीमुळे अक्षरशः चिखल झाला. आ. लंके यांनी भेट घेतल्यानंतर वयोवृध्द पायमोडे यांना आश्रू अनावर झाले. गेल्या शंभर वर्षात असे संकट आले नव्हते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आ. लंके यांनी पायमोडे यांना धिर देत शासनाची मदत मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
वनकुट्यातील साहेबराव बाचकर यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघडयावर आला. त्यांची मुलगी राणी हिच्या पायावर दगड पडून ती जखमी झाली. आ.लंके यांनी राणी हिची विचारपूस करून तिच्यावर उपचार करण्याच्या सुचना दिल्या. बाळासाहेब खामकर यांच्या घरापुढील टपरी उडून शेजारच्या शेतात जाऊन पडली. त्यात एक गाय जखमी झाली. बबन मुसळे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसारऊपयोगी साहित्याचे नुकसान झाले. पत्रे उडाल्यानंतर दगड पडल्याने ७१ वर्षीय बबन मुसळे यांच्या खांद्याला जखम झाली. आ. लंके यांनी मुसळे कुंटूंबास धिर देत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
गोरक्षनाथ गायकवाड यांना घरकुल योजनेअंतर्गत घर मंजुर झाले असून त्याचे सुरू असलेले बांधकाम पाउस तसेच गारपीटीमुळे जमीनदोस्त झाले. त्याचीही आ. लंके यांनी पाहणी करून त्यांना शासनाची काय मदत करता येईल यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. पळशी येथील मोहन शिंदे यांची विटभट्टी तसेच कामगारांच्या घरांचे गारपिटीने नुकसान झाले. प्रविण गागरे यांच्या गोठयावरील पत्रे उडाल्याने तेथील जनावरे रात्रभर उघडयावरच होती. विट भट्टीवरील पुनाजी बर्डे यांनी आ. लंके यांच्याशी संवाद साधताना आमच्या पोटाची खळगी कशी भरायची असा सवाल करीत मदतीची याचना केली. आ. लंके यांनी बर्डे यांच्यासह सर्वांना धिर देत मदतीची ग्वाही दिली. खडकवाडी येेथील टोमॅटो, कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीचीही आ. लंके यांनी पाहणी केली.
आ. लंके यांच्या समवेत अॅड. राहुल झावरे, प्रकाश राठोड, अप्पासाहेब शिंदे, श्रीरंग रोकडे, डॉ. रावसाहेब आग्रे, आदीनाथ ढवळे, अर्जुन कुलकर्णी, योगेश शिंदे, रवि ढोकळे, गणेश मधे, अमोल डूकरे, बाळासाहेब खामकर, रामा साळवे, प्रविण गागरे, संकलेश मोढवे आदी यावेळी उपस्थित होते.

किती दिवस धुळफेक करणार ?
हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासिन आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कीतीही दौरे करावेत, देवदर्शन करावे त्यावर आपली काहीही तक्रार नाही. परंतू हे करीत असताना त्यांनी शेतकऱ्यांकडेही पहावे.सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास तयार नाही. ते कीती दिवस धुळफेक करणार आहेत ? किती दिवस फसवणार आहेत ? महसूलमंत्री, पालकमंत्री मोठी माणसे आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा होती मात्र ते देखील शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत ही खेदाची बाब आहे.
निलेश लंके आमदार
आमच्या गावाला का टार्गेट केले जातंय ?
चरपटीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवात गावच्या नव्या कारभाऱ्यांनी मंदीरात पवित्र विना नेऊन तसेच भजन किर्तनाचे कार्यक्रम केले. परंपरेनुसार या देवस्थानाजवळ पशुहत्या केली जाते. त्यामुळे तेथे विण्याचे पावित्र राखणे आवष्यक होते. जुन्या रूढी पंरंपरेप्रमाणे आवजर तेथे कधीही विना अथवा भजन किर्तनाच कार्यक्रम झाले नाहीत. गाव कारभाऱ्यांनी देवाची मान मार्यादा पाळायला हवी होती. त्यामुळेच तर आमच्या गावावर हे संकट आले का ? आमच्या गावाला का टागेट केले जातंय ?
पिरन शेख
बाळासाहेब गागरे
ग्रामस्थ, वनकुटे