..तर पारनेर तहसिल कार्यालयात पेरू वाटप आंदोलन ~शरद पवळे

शिव पाणंद शेतरस्ते पाझर तलावांच्या दुरुस्त्यांसाठी शेतकर्यांचे पारनेर तहसिलदारांना निवेदन
दत्ता ठुबे
पारनेर:-पारनेर तालुका जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, स्वातंत्र्यवीर सेनापती बापटांचा तालुका असुन या तालुक्याने अनेक मोठमोठ्या समाजहिताच्या चळवळींनी तालुक्याला दिशा दिली असुन याच पारनेर तालुक्यात सुरु झालेली शिवपाणंद शेतरस्त्यांची चळवळ राज्यभर पोहचली असुन चळवळीची दखल घेत अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शिवपाणंद शेतरस्त्यांची कामे होताना दिसत आहे परंतु अहमदनगर जिल्हयात आंदोलनाला गांभिर्याने घेत जिल्हाधिका-यांनी सप्तपदी अभियानातुन शिवपाणंद रस्ते खुले करण्यासाठी अवाहन केले असता पारनेर तालुक्यातुन सर्वाधिक शेतरस्त्यांचे अर्ज पारनेर तहसिलला देण्यात आले परंतु तहसिल प्रशासनाकडून अर्जांना केराची टोपली दाखवण्यात आली त्यामुळे वाट पाहून कंटाळून अखेर पुन्हा पारनेर तालुक्यातील गावोगावचे शिवपाणंद शेतरस्ते , पाझर तलावांसह पुरातन जलस्रोतांच्या दुरुस्तीसाठी व शेतकऱ्यांना सप्तपदीचे फसवे आमिष दाखवणारे अधिकारी यांच्यावर दि.२४/०४/२०२३ पर्यंत कार्यवाही करावी अन्यथा पुन्हा नव्याने उभ्या झालेल्या शिव पाणंद शेतरस्ते, पुरातन जलस्रोत पुनर्जिवन चळवळीच्या माध्यमातुन पारनेर तालुक्यातील शेतकरी पारनेर तहसिल कार्यालयात पेरु वाटप आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांसह शेतरस्ते पिडीत शेतकरी भाऊसाहेब वाळुंज, रामदास खोमणे, दशरथ वाळुंज, बाळासाहेब औटी, संतोष लोणकर, हौशीरा कुदळे यांसह शेतकर्यांनी नायब तहसिलदार गणेश आढारी यांच्यासह पारनेर पोलिस स्टेशनला निवेदन दिले.