सरपंच प्रकाश गाजरे व संघर्ष ग्रुपने वंचितांची दिवाळी साजरी केली आमदार निलेश लंके

२ हजार कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे वाटप
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पोखरी म्हसोबा झाप गावांसह इतर १२ गावात संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून सरपंच प्रकाश गाजरे यांनी जवळपास 2000 कुटुंबियाना दिवाळी फराळाचे वाटप करून खरी वंचितांची दिवाळी साजरी केल्या असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले
. या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन आमदार यांनी सरपंच प्रकाश गाजरे यांचा विशेष सन्मान केला गावागावात गटागटात ही सामाजिक चळवळ कार्यकर्त्यांनी रुजवली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, वाळवणे सरपंच उद्योजक सचिन शेठ पठारे, महेंद्र गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या चार ते पाच वर्षापासून म्हसोबा झाप पोखरी वारणवाडी कन्हेर या ठिकाणच्या संघर्ष ग्रुपने दिवाळी सणाच्या काळात किराणा मालाचे वाटप करून दिवाळी सण साजरा करत असतात
यावर्षी म्हसोबाझाप ग्रामपंचायत मध्ये प्रति नागरिका पाठीमागे एक किलो याप्रमाणे ५ टन साखरेचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सरपंच प्रकाश गाजरे यांनी दिली आहे. या व्यतिरिक्त सामाजिक शैक्षणिक आरोग्य व धार्मिक उपक्रम या संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून परिसरातील आठ ते दहा गावात राबवली जात आहेत.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील आदिवासी व गरीब बांधवांना म्हसोबाझाप पोखरी वारणवाडी मांडवे, देसवडे, वासुंदे,कर्जुले हऱ्या,नांदूर पठार,पिंपळगाव रोठा, सावरगाव, पळसपुर काटाळवेढा या गावातील २ हजार कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप केले आहे. दिवाळी सणाच्या काळात हा सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी संघर्ष ग्रुप निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने माऊली बेलकर,पांडुरंग आहेर, भाऊसाहेब कोकाटे,गणेश वाकळे,अशोक आहेर,हरि रोहकले सुभाष दरेकर,गणेश वाळुंज,बाबाजी आरोटे, साहेबराव करंजकर, योगेश पवार, बाळासाहेब शिंदे, नामदेव करंजकर,गणेश दरेकर,संदीप गुंजाळ,अरुण बेलकर,दीपक आरोटे,प्रदीप रोहकले,संजय बेलकर रवी वाळुंज,अनिकेत अरोटे,सचिन अरोटे,उत्तम दाते,अशोक वाळुंज,रवी किरण गाजरे,अविनाश बेलकर,राहुल गाजरे,सहील गाजरे,आकाश बेलकर, कैलास आहेर, अशोक वाळुंज,राहुल गाजरे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
–