नेवासा तालुक्यातील करजगाव येथे महारुद्र याग सोहळा जल्लोषात संपन्न:

नेवासा प्रतिनिधी :
पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे येथील आद्य परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी महाराज यांच्या आशीर्वादाने रविवार दिनांक 9 एप्रिल रोजी नेवासे तालुक्यातील करजगाव येथे महारुद्र याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या रुद्रायाग सोहळ्यात महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील हजारोच्या संख्येने दादाजी भक्तांनी हजेरी लावली . मानवी जीवनामध्ये आपणास अनेक प्रकारच्या अडचणी व संकटांना तोंड द्यावे लागते पितृदोष,कालसर्प दोष,ग्रह दोष, अकाली मृत्यू असे अनेक प्रकारचे दोष निवारण स्वामींच्या कृपेने या यज्ञ सोहळ्यात करण्यात आले आहेत.या रुद्र याग सोहळ्यास हजारोंच्या संख्येने भाविक यज्ञासाठी बसले होते. या ठिकाणी प्रथम आद्य स्वामी परम सद्गुरु शिवानंद दादाजी व जगत जननी जगत माता धुनी द्वारिका मैया यांचे पाद्यपूजन करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महान धुनीवाले धनंजय सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सुरुवातीला आलेल्या भाविकांसाठी सकाळी 8:00 वाजता चहा नाश्ता देण्यात आला व नंतर लगेच महारुद्र यागसाठी त्यांना बसवण्यात आले व लगेच धुनीवाले दादाजी तसेच ईस्ट देवी देवता यांचे पंत मंत्र पठण ब्राह्मणांकडून करण्यात आले. सकाळी 10 वाजता सुरू झालेला यज्ञ सोहळा संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू होता. या यज्ञांमध्ये आहुती देण्याचे कार्य आलेल्या भाविकांकडून करण्यात आले तसेच यज्ञासाठी लागणारे साहित्य पुरवण्याचे कार्य ओम स्वामी शिवानंद दादाजी परिवारातील बहुसंख्य गुरुबंधू भगिनींनी केले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नवीन गुरु बंधू-भगिनींसाठी स्वामींच्या हस्ते अनुग्रहाचा कार्यक्रम झाला नंतर ठीक ७:३० वाजता स्वामींच्या महाआरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली.

या ठिकाणी प.पू. माऊली योगिता मैया यांचेही आगमन झाले होते. या यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी स्वामीजींच्या दर्शन सोहळ्यात व सहवासामध्ये संपूर्ण दिवसभर उपस्थित राहून तपोबल प्राप्ती करून घेतली. सदर कार्यक्रम हा ओम शिवानंद दादाजी दरबार करजगावच्या प्रांगणामध्ये पार पडला. या ठिकाणी मंडप व्यवस्था,लाईट डेकोरेशन,पार्किंग व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. बाळासाहेब भांड, रावसाहेब नांगरे,भारत साळवे, संभाजी राजे वामन, खेडकर सर, यांनी यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले तसेच या ठिकाणी दादाजी नामाचा जयघोष करीत भजन सत्संग ही दिवसभर चालू होता अशी माहिती महान धुनीवाले धनंजय सरकार यांनी दिली.