अहमदनगर

राजुर प्रकल्प कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराच्या विरुद्ध सुनीता भांगरे आक्रमक!

आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्र्यांची घेतली भेट उपोषणाचा दिला इशारा

संजय महानोर

भंडारदरा / प्रतिनिधी

आश्रमशाळा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड याबाबत अनेकवेळा सूचना देऊन ही कोणतेही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखतांच्या व्हाईस चेअरमन सुनिताताई भांगरे यांनी थेट आदिवासी विकास मंञी गावित व ,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, पाटील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची भेट घेत या विषयावर आमरण उपोषण करत असल्याचा इशारा दिला आहे .
अकोले तालुक्यातील राजुर गटाच्या जि . प .सदस्या सुनिताताई भांगरे यांनी आश्रमशाळेत मुलांची होत असलेली हेळसांड , शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर होत अन्याय याबद्दल आवाज उठविला असुन अनेकदा प्रकल्प कार्यालयाच्या अधिका-यांना ही बाब लक्षात आणुन दिली .तरीसुद्धा अधिका-यांनी कोणतीही कारवाई न करता शिक्षक व कर्मचा-यांनाच पाठीशी घातले . जोपर्यंत प्रकल्प अधिकारी व दोषी असणा-या कर्मचा-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा त्यांनी दिला आहे . मवेशी येथील मुलांना मिळणारे निकृष्ट दर्जाचे जेवण , अस्वच्छता , मुलींच्या बाथरुमला नसणारे दरवाजे अशा अनेक गोष्टी सुनिताताईंच्या निदर्शनास आल्या होत्या . तर पिंपरकणे येथील ग्रामस्थांनी सुनिताताईकडे शाळेच्या गैरसोयीबद्दल तक्रार केली होती .त्या तक्रांरीची दखल घेत सुनिताईंनी थेट शाळा गाठत तेथील विद्यार्थ्यांसाठी असलेली असुविधाबद्दल नाराजी व्यक्त केली होती .
वरील सर्व प्रकार लक्षात येऊनही प्रकल्प अधिकारी झोपेचे सोंग घेत असलेले बघुन सुनिताताईंनी थेट मंत्रालयात जाऊन आश्रमशाळेमध्ये सुरु असलेला प्रकार आदिवासी विकास मंत्री गावित , महसुल मंत्री राधाकृष्ण विखे व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या कानावर घातला . जोपर्यंत दोषी असणा-या अधिकारी व कर्मचा-यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे यावेळी त्यांनी मंत्र्यांना ठामपणे सांगितले असुन मंगळवारी सकाळी अकरा वाजेपासुन आपण राजुर येथील प्रकल्प कार्यालयात उपोषणास बसणार असल्याचे सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button