सुजीत झावरे पाटील यांनी वनकुटे येथे केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

दत्ता ठुबे
पारनेर:-गेल्या दोन दिवसापासून झालेल्या गारासह वादळी पावसाने वनकुटे व परिसरात शेतकऱ्यांचे शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाल्याने प्रत्यक्ष नुकसानग्रस्त ठिकाणी जाऊन पाहणी करताना सुजित झावरे पाटील समवेत प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार अावलकंठे, गट विकास अधिकारी माने,कृषी अधिकारी गायकवाड, सरपंच व ग्रामसेवक उपस्थितीत होते.

महसूल मंत्री मा. ना श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पुर्ण माहिती देण्यात आली. यावेळी नामदार साहेब यांनी येत्या एक दोन दिवसात पाहणी करणार असल्याचे सांगितले.

यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी वनकुटे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थितीत होते. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना पिण्यासाठी टँकर उपलब्ध करून देणे, बांधावर जाऊन नुकसाग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून सरसकट भरपाई देण्यात यावी तसेच ज्या नागरिकांचे घरांचे नुकसान झाले आहे त्यांची देखिल भरपाई देण्यात यावी. वनकुटे, तास, पळशी, खडकवाडी व परिसरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याठिकाणी देखिल सरसकट पंचनामे करण्यात यावते अशी मागणी केली तसेच वनकुटे येथे ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना १०किलो गहू, १०किलो तांदूळ देण्याची मागणी सुजित झावरे पाटील यांनी केली असता मा. तहसीलदार यांनी संबंधित रेशन दुकानदार यांना नुकसानग्रस्तांना धान्य देण्याचे आदेश दिले.