चांदा दरोडा प्रकरणी ओंकार कर्डिले हत्येचा सोनई पोलिसांचा तपास दिशाभूल करणारा

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
चांदा येथील दरोडा प्रकरणी ओंकार कर्डिले हत्येचा सोनई पोलिसांचा तपास दिशाभूल करणारा असून हा तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचेकडे देण्यात यावा अशी मागणी श्री. गंगाधर नामदेव कर्डिले,यांनी केली आहे
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 01/03/2022 रोजी चांदा, ता. नेवासा, येथील
कर्डिले वस्तीवर दरोडा पडला व उच्चशिक्षीत मुलगा ओंकार कर्डिले (वय-20) याचा निर्धुन खुन
करण्यात आला व इतर माणसे जखमी करण्यात आले. वरील घटनेस अडिच महिने कालावधी
होवून गेली तरी अडिच महिन्यांनतर सर्व आरोपींचा तपास अद्याप पर्यंत लागला नाही. घटनेच्या
वेळी 3 तासात फिर्याद दिली त्याचवेळी फिर्यादी भाऊ नवनाथ कर्डिले घाबरलेल्या अवस्थेत
असताना त्याच्याकडून तपासी अधिकारी यांनी फिर्यादीच्या तोंडुन आरोपीचे नाव वदवून घेणे किंवा
त्याआरोपीची आजपर्यंत ओळखपरेड न घेणे, अशा प्रकारे हत्याकांड प्रकरणाची दिशाभुल करणारा
तपास असल्यामुळे
सदर प्रकरणी सोनई पोलिस स्टेशनचे पोलीस करतील असे मला वाटत नाही.तरी सोनई येथील तपासी अधिकारी यांच्याकडील सदर गुन्ह्याचा तपास काढुन घेवून तो पोलिस निरीक्षक अथवा वरीष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचेकडे देण्यात यावा अशी मागणी चांदा येथील श्री गंगाधर नामदेव कर्डिले यांनी केली आहे