अहमदनगर
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी !

सावरचोळ, मेंगाळवाडी, निमंगाव खु, निमंगाव बु, पेमगिरी, नांदुरी दुमाला भागात अवकाळी चा फटका
संजय साबळे
संगमनेर प्रतिनिधी
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज सावरचोळ, मेंगाळवाडी, निमंगाव खु, निमंगाव बु, पेमगिरी, नांदुरी दुमाला येथील अवकाळी पावसाने व गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व तातडीने पंचनामे करून मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
यावेळी डाॅ. जयश्रीताई थोरात, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, संतोष हासे, सोमनाथ गोडसे, विलास कवडे, प्रांताधिकारी शंशिकात मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका कृषी आधिकारी प्रविण गोसावी, विद्युत विभागाचे JE गडाख आदिंसह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, शेतकरी बांधव उपस्थित होते.
