भातोडी व केळ तलावाचे पाणी सोडा – बबनराव शेळके

प्रतिनिधी :
( संजय महाजन )
मोठ्या प्रमाणावर ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, तसेच इतर पिके मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पेरली असून पाण्याचा अभाव असल्याकारणाने आमच्या शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला घास पाण्याअभावी हिरावून घेतला जाऊ शकतो, असे भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बबनराव शेळके यांनी एका निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांची पिके वाळून चालली आहेत, आणि भातोडी तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा असून तलावाचे पाणी त्वरित सोडण्यात यावे.
त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले भातोडी तलावाचे पाणी भातोडी, चिचोंडी पाटील, सांडवा मांडवा, उक्कडगाव,, दशमी गव्हाण, टाकळी काजी, त्वरित सोडण्यात यावी शेतकऱ्यांची पिके सध्या सुकून चाललेली आहेत, यामुळे भातोडीतलावाचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नवसंजीवनी असून चारी दुरुस्त करून पाणी सोडले नाही तर हातात तोंडाशी आलेला घास पाण्याअभावी हिरावून घेतला जाईल आणि यातून आमचे शेतकरी कर्जबाजारी होऊ शकतात होऊ शकतात, त्याचबरोबर चिचोंडी पाटील केळ तलावाचे पाणी सुद्धा कॅनॉल दुरुस्त करून पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त असणारा पाणीसाठा शेतकऱ्यांच्य पिकांसाठी सोडण्यात यावा अशी मागणी भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बबनराव शेळके यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी दत्तात्रय मोरे साहेब यांच्याकडे केली असून त्या पद्धतीचे निवेदन सुद्धा पाठवलेले आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी दत्तात्रय मोरे साहेब कायमच शेतकऱ्यांसाठी सहकार्य करतात आणि ते हा निर्णय लवकरात लवकर घेतील, पाणी सोडण्याचा निर्णय त्वरित न घेतल्यास पाटबंधारे विभागाच्या विरोधात शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन केले जाईल असेही शेळके यावेळी म्हणाले.