स्व.बाबूराव बो-हाडे यांची जयंती साजरी

कोतुळ दि11
स्व.बाबुराव सखाराम बो-हाडे (बी.एस.बी.) एज्युकेशनल संस्था उल्हासनगर ४ संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोतुळ ,ता.अकोले,जि.अहमदनगर या विद्यालयात संस्थेचे संस्थापक स्व.बाबुराव सखाराम बो-हाडे यांची ९३ वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.संजय देशमुख उपसरपंच कोतुळ यांनी भुषविले.प्रास्ताविक मा.मुख्याध्यापक श्री.शरद देशमुख यांनी केले.या प्रसंगी जि.प.सदस्य श्री.रमेशकाका देशमुख यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आई वडीलांची सेवा करावी व मोठे स्वप्न पहा असे सांगितले.तर माजी जि.प.उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख यांनी स्व.बो-हाडे बाबांच्या कार्याचा गौरव केला व बाबांनी अनेक स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाअसे सांगितले.

माजी उपसरपंच श्री.राजेंद्र देशमुख यांनी बाबांचे कार्य महात्मा फुले यांच्या कार्याप्रमाणे असल्याचा उल्लेख केला.प्रमुख व्याख्याते श्री.संदिप कोते सर यांनी आपल्या विनोदी भाषणाने सर्वांचे मनोरंजन केले.
याप्रसंगी विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी श्री.सोमदास पवार,श्री.मनोज देशमुख,श्री.शिवाजी तुकाराम देशमुख, श्री.बी.के.देशमुख सर,श्री.देवानंद पोखरकर,गूरूदत्त कोते, ज्ञानेश्वर पवार,श्री.आर.बी.देशमूख सर, पत्रकार श्री.सूनिल गिते,नवले बाबा, वाकचौरे बाबाजी श्री.सूनिल आरोटे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
