अहमदनगरकृषी

सुजीत झावरे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन नमले!

मांडओहोळ परिसरातील वीज पुरवठा सुरळीत होणार

पारनेर प्रतिनिधी :
कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना शेतकऱ्यांना न देता तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान असलेल्या मांडओहोळ धरण परिसरातील कर्जुले हर्या, वासुंदे, गुरेवाडी, भोरवाडी, कन्हेर, म्हसोबा झाप, कामटवाडी या भागातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले होते

. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली.
शासकीय स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांची समस्या त्यांनी प्रशासनापुढे मांडली. मांडओहळ परिसरातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने कोणत्या ही प्रकारे वीज तोडू नये. अन्यथा आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ असा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने शासकीय स्तरावर बैठक घेऊन मांडओहळ परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करून देणार असल्याचे सांगत तशा पद्धतीचा आदेशच तहसीलदारांनी पुन्हा महावितरणला काढला आहे.
दरम्यान सुजीत झावरे पाटील यांनी शेतकर्यांच्या बाजूने योग्य भूमिका मांडल्यामुळे व प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सुजित पाटलांनमुळे प्रशासन नमले : शंकर बर्वे

शेतकऱ्यांच्या समस्यांवर नेहमीच काम करत असलेले सुजीत झावरे पाटील यांनी मांडओहळ परिसरातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. असं मत यावेळी वासुंदे गावचे उपसरपंच शंकर बर्वे यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button