क्रांतिसूर्य महात्मा फुलेंच्या जयंतीचा कोतुळकरांना विसर!

कोतुळ प्रतिनिधी
शासन निर्णय, सामन्य प्रशासन विभाग क्र. जपुती २२०८/१३३८ प्र. क्र. १०९/०८/२९ दि. २४/११/२००८ मधील सूचना नुसार प्रत्येक विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखां ने कार्यवाही करून ह्या शासन
निर्णय नुसार सर्व महापुरुषांच्या जयंत्या सरकारी व निम सरकारी कार्यालायत साजरे करणे बंधनकारक असताना देखील मौजे कोतुळ ग्रामपंचायत येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांची साजरी करण्यात आली नाही कोतुळ ग्रामपंचायत ला या चा विसर पडला
दि. ११/०४/२०२३ रोजी फुले यांची जयंती होती.
मात्र ग्रामपंचायतीला याचा विसर पडला स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या यामहान महामानवाच्या जयंतीचा जाणीव पूर्वक विसर कोतुळ ग्रामपंचायत ला कसा पडला असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी न करून महापुरुष फुले यांचा अपमान केलेला आहे तरी या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर सचिन भाऊसाहेब गिते सोपान घोलप ,खंडेराव शिंदे दिपक जाधव सुनिल देशमुख. गणपत गीते अण्णासाहेब बेळे गिते सार्थक ,बाळासाहेब फुलसुंदर देशमुख महेंद्र सुरेश, बेळे शंकर प्रभू
केतन संजय घोलप जाधव,गिते पंकज , गिते अर्जुन ,फारुख पठान ,सीताराम गीते, साबळे संपत,बापुसाहेब देशमुख ,विजय बेळे ,लक्ष्मण गिते पुंजीराम खरात ,विलास साळवे,अरुण घोलप ,शंकर घोलप ,गणेश नारायण खरात
हरिदास शेटे आदींच्या सह्या आहेत निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविल्या आहेत