नेप्ती येथे महात्मा फुले जयंती साजरी!

अहमदनगर /प्रतिनिधी
नगर तालुक्यातील नेप्ती येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सावता महाराज मंदिरात सावता महाराजांची आरती करून विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा फुले यांच्या प्रतिमेस समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले ,माजी सरपंच अंबादास पुंड, प्रा.भाऊसाहेब पुंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी समता परिषदेचे शाखाध्यक्ष शाहूराजे होले, बाजार समितीचे माजी संचालक वसंत पवार , समता परिषदेचे नेते भानुदास फुले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, संतोष चौरे ,रोहिदास भुजबळ, सिताराम पुंड, तुषार भुजबळ, नानासाहेब बेल्हेकर, बालनाथ पुंड, संतोष लोंढे, नितीन पुंड, कुणाल शिंदे, संतोष बेल्हेकर, तेजस नेमाने, सार्थक होले, नितीन शिंदे, मिलिंद होले, रमेश रावळे, हर्षल चौरे, सुमन भुजबळ, गायकवाड मॅडम ,मंगल फुले, रोहिणी पुंड, बापूशेठ पुंड, विनायक बेल्हेकर, सागर शिंदे, राजू शिंदे, यमुना पुंड व परिसरातील महिला ग्रामस्थ व समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

……….