अब्जाधीश केशब महिंद्रा यांचं निधन, किती आहे संपत्ती?

दि.१२– महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष व जगातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश केशब महिंद्रा यांचं आज निधन झालं. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल उद्योग क्षेत्रात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.
केशब महिंद्रा यांच्या नावे १.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. महिंद्रा समूहाचे संचालक म्हणून २०१२ साली निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी या उद्योगाची सूत्रे आपले पुतणे आनंद महिंद्रा यांच्याकडं सोपवली होती.
केशब महिंद्रा हे १९४७ मध्ये आपल्या वडिलांच्या कंपनीत रुजू झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी लोकोपयोगी वाहनांच्या निर्मिती व विक्रीवर लक्ष्य केंद्रित केलं. सन १९६३ मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २०१२ पर्यंत सुमारे ४८ वर्षे कंपनीची सूत्रे त्यांच्या हातात होती. त्यांच्या नेतृत्वात महिंद्रा समूहानं वाहननिर्मिती उद्योगापासून ते आयटी, रिअल इस्टेट, फायनान्स व आदरातिथ्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत विस्तार केला. जागतिक पातळीवरील नामवंत उद्योगांसोबत महिंद्रा समूहाची भागीदारी घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या सहकार्याचा महिंद्रा समूहाला मोठा फायदा झाला.
केशब महिंद्रा यांनी सेल, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, इंडियन हाॅटेल्स, आयएफसी आणि आयसीआयसीआयसह अनेक खासगी व सरकारी कंपन्यांच्या संचालक मंडळात काम केलं होतं. हुडकोचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोएंका यांनी केशब महिंद्रा यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. ‘उद्योग जगतानं आज एक उत्तुंग व्यक्तिमत्व गमावलं आहे. केशुब महिंद्रा यांना तोड नव्हती. अशा छान व्यक्तीच्या सहवासाचे भाग्य मला लाभले. त्यांच्या भेटीची मला नेहमीच उत्सुकता असे. व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सामाजिक बाबींचा मेळ त्यांनी कसा घातला हे जाणून घ्यायला आवडत असे. त्यांच्याशी झालेल्या या संवादातून मला प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. ओम शांती, असं पवन गोएंका यांनी म्हटल