विकास क्रांती सेनेचे जनआंदोलन अकोले तहसिल कार्यालयावर धडकले.

पाच दिवस पायी मोर्चा,ने दिले निवेदन दिले.
अकोले प्रतिनिधी
अकोले , संगमनेर तालुक्यातील विकासापासून वंचित व दुर्लक्षित भागासाठी विकास क्रांती सेनेने विविध विकासाच्या मागण्या करत घारगाव पासून 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता पासून ते 12 जानेवारी 2024 पर्यंत घारगाव ते अकोले रत्याने पायी चालत व जनजागृती करतं विकासाच्या विविध मागण्यांसाठी बेलापूर , ब्राम्हणवाडा, कोतूळ, अकोले तहसील या चार ठिकाणी चार दिवसांच्या मुक्कामासह ६५ किलोमिटर अंतर,अकोले तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा शांततेच्या मार्गानें पोहचला आहे.यापूर्वी दिलेल्या निवेदना प्रमाणे विकास क्रांती सेनेने पायी मोर्चा पूर्ण केला आहे.
अकोले तालुक्यातील बोटा ते राजूर राज्यमार्ग 23 हा संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा राज्यमार्ग आहे.या राज्यमार्गाचे दुपदरीकरण व अकोले तालुक्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने इतर राज्यमार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे.येसरठाव व पळसुंदे धरणातून चील्हेवाडी धरणात पाणी सोडत. चील्हेवाडी धरणातून जलसिंचन प्रकलापतून कचनदी बारमाही करणे, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बोटा रेल्वे स्टेशन उभारणे.तसेच हा रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून गेला पाहिजे. अकोले तालुक्यातील पठार भाग व संगमनेर तालुक्यातील पठार भाग जोडून दुष्काळ ग्रस्त म्हणून घारगाव तालुक्याची निर्मिती करण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन तहसिलदार सतिश थेटे यांना देत शासन दरबारी मागण्या पोहचविण्याची विनंती जनआंदोलनातून करण्यात आलीय.
सदर मागण्यांन बाबत शासन/ प्रशासन/सरकारने योग्य ती कार्यवाही करून सदर कामे मार्गी लावावी.दुर्लक्षित व वंचित भागाच्या विकासासाठी येत्या महिनाभरात समाधान कारक कार्यवाही अथवा कामे न झाल्यास विकास क्रांती सेना पुढील आंदोलनाची दिशा ठरवून लोकशाही मार्गानें पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे करेल. यामध्ये समाजाचा उद्रेक झाल्यास अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा विकास क्रांती सेना अध्यक्ष भगवान काळे, उपाध्यक्ष जालिंदर गागरे,कार्याध्यक्ष संतोष फापाळे, सतीश फापाळे,समन्वयक लहू नाना काळे,सुरेश खेबडे, पोपटराव फापाळे,उत्तम कोकाटे, शिवनाथ हुलवळे,सरपंच महेंद्र फापाळे, सुरेश फापाळे,रवी महाले,संतोष शेळके,यशवंत शेळके,प्रकाश फापाळे,प्रवीण महाले,प्रा.प्रवीण शेळके, बी. जे देशमुख,रमेश काका देशमुख, धनंजय देशमुख, राजेंद्र देशमुख,किशोर जाचक,किसन भोईटे,रभाजी फापाळे,दिलीप कोकाटे, हौशिराम गोपाळे,योगेश महाले, दत्तात्रय महाले, संजय वाकचौरे,कैलास शेळके,राहुल लांडे, जयनाथ मवाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.