अहमदनगरइतर

आण्णासाहेब हजारेंना जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला ४२० व्होल्टेजचा करंट द्यावा-शरद पवळे:

दत्ता ठुबे

त्या माथेफिरूला तात्काळ अटक केल्याबद्दल पोलिसांचे आभार ,पण गांभिर्याने घ्या!


पारनेर:-ज्येष्ठ समजासेवक आण्णासाहेब हजारे यांना आतापर्यंत समाजहिताची कामे करत असताना अनेक धमक्या आल्या याला कधी भिक न घालता आण्णांनी समाजसेवेचे घेतेलेले व्रत थांबवले नाही त्यातच आता श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गयधने या माथेफिरूने आपल्या शेतीच्या वादाला प्रशासनाबरोबर काही व्यक्तींना जबाबदार धरत आपल्या वादाचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांना भेटल्याचे प्रसिद्धी माध्यमातून समजले असून जीवनभर समाजासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्म्याला १ मे रोजी जीवे मारण्याची धमकी देवून आपला शेतीचा वाद सोडविण्यासाठी नवीन शक्कल लढवणारा हा संतोष गायधने नावाचा मोथेफिरू याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पोलिसांचे तमाम सामाजिक कार्यकर्त्यांचे वतीने आभार मानण्यात येत असुन पोलिस प्रशासनाबरोबर सरकारनेही या गोष्टीला गांभिर्याने घेत आदरणीय आण्णांची सुरक्षा वाढवायला हवी आण्णांच्या अनुभवरूपी विचारांची आज समजाला, देशाला गरज असुन अशा अनेक घातक प्रवृत्ती समाजात उभ्या राहत आहेत त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी प्रशासनाबरोबर समाजानेही उभे राहायला हवे त्याचबरोबर आण्णा हजारे व्यक्ती नसुन एक विचार आहे तो संपवण्याची ताकत कोणात नाही इतिहासात महापुरुषांना झालेल्या त्रासाला समोर ठेवल्यास हे आपल्याला लक्षात येईल किती आले आणि किती गेले समाज सत्यासोबत होता सत्यासोबतच राहणार त्यामुळे आदरणीय आण्णांणी आदर्श गाव ते समाजहितासाठी उपोषण आंदोलनाच्या माध्यमातुन सरकार विरोधात उभे राहून माहीती अधिकारासह अनेक कायदे तयार केलेले कार्य भावी पिढीने समजून घेणे गरजेचे असुन आदरणीय आण्णांनी अहिंसेच्या मार्गाने लोकशाहीला बळकट करण्याची लढाई लढून मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे याला कोणी गालबोट लावत असेल तर त्याला वेळीच वठणीवर आणणे गरजेचे आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसिद्धि माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

आदरणीय आण्णांनी व्यक्तीगत सुखाचा त्याग करत माझा गाव माझा देश माझा समाज हाच माझा परिवार हि संकल्पना उराशी धरून आपले जीवन समाजकार्यासाठी अर्पण केले असुन त्यांच्यासारखी समाजसेवा करण तर दूरच त्यांच कार्य समजून घेण्याची क्षमता निर्माण होण हे आजच्या काळात मोठ्या हिंमतीच ठरेल आज देश विदेशातून अनेक कार्यकर्ते आण्णांचे कार्याला प्रेरित होवून आपआपल्या भागात आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी निस्वार्थी सेवा करत आहेत आदरणीय आण्णांच कार्य थांबलेल नसुन त्यांच्या कार्याचा मोठा वटवृक्ष बनला आहे याला समजुन घेण्यासाठीची ती ऊंची टिका करण्याऱ्यांमध्ये नसल्याने आज आण्णा हजारे यांच्या नावाने बरळत असतात-

शरद पवळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button