इतर
विशेष मागास प्रवर्गाचे (SBC) २ टक्के आरक्षण टिकवण्यासाठी ‘जनजागरण’

.
———————
‘
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचा पुढाकार …
सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयात विशेष मागास प्रवर्गाचे (SBC) २ टक्के असलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी ‘युथ ऑफ इक्वालिटी’ या संस्थेने याचिका दाखल केले आहे.
सदरच्या याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी ‘शेवटची संधी’ म्हणून देण्यात आले आहे. आरक्षण रद्द झाले तर, भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘एसबीसी’च्या (SBC) अस्तित्व टिकवण्यासाठी जनजागरण आणि परिसंवाद रविवार, दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ठीक शार्प १० वाजता पूर्व भागातील श्री मार्कंडेय रुग्णालय जवळील श्रीराम मंदिर येथे आयोजन केले आहे.