जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी देवराव झावरे हे ३१ वर्षाच्या सेवेतून निवृत्त..

.
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
जिल्हा सहकारी बँकेचे शाखाधिकारी श्री देवराम झावरे 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ सोहळा सिताराम सर खिलारी यांच्या शुभहस्ते कटारिया मंगल कार्यालय येथे पार पडला,
यावेळी शिवाजी खिलारी, उपसभापती विलास झावरे, माजी चेअरमन बबनराव पायमोडे, संजय झावरे ,बापूसाहेब रांधवन, अरुणराव ठाणगे,सेवा सोसायटी संचालक नारायण झावरे , मोहनराव रांधवन , सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष भालेकर साहेब , बँकेचे अधिकारी , इंद्रभान शेळके, लाळगे साहेब ,पठारे मेजर गोकुळ लोंढे ,चंद्रकांत गायकवाड , वंदना कोरडे, मुक्ता आंधळे ,सासवडे मॅडम,शिवराज गागरे, किरण गागरे, प्रकाश कोरडे , कदम साहेब, खोसे साहेब ,कचरे साहेब, , विजयानंद साळवे,मंचरे साहेब, बाबा गागरे,राजेंद्र म्हस्के, विष्णू दरेकर , आर के भांड , यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी विजयानंद साळवे म्हणाले की,सेवकांसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आई आहे,ज्याप्रमाणे मुलाचे हट्ट आई पुरवते,त्यातूनच सेवकांची कौटुंबिक उन्नती होत असते असाच अनुभव बँकेचा सेवक म्हणून काम करताना आला.
पदाधिकाऱ्यांना सेवकांबद्दल खरी माहिती असतेच असे नाही,मात्र ग्राहकांना चांगली सेवा मिळावी आणि बँकेचा नावलौकिक वाढावा,कामे जलद गतीने व बिनचूक व्हावीत ही अपेक्षा असते आणि ती योग्य असते मात्र बऱ्याचदा गैरसमजातून व्यक्तिगत आकसापोटी कळीचे नारद पदाधिकाऱ्यांचे कान भरवून चांगल्या सेवकांवर अन्याय करण्यासाठी अधिकार पदाचा वापर करतात तेथे महिलांचाही विचार केला जात नाही हे अनुभवयास मिळते ही खंत आणि खेदाची बाब आहे.
अचानक एखाद्याच्या तोंडात मारायची आणि त्याला लेखी तोंडी कारण सांगायचे नाही हा प्रकार म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे त्यातून बदल्याची भावना तयार होते हे घडवून आणणारे कळीचे नारद आपल्यातच असतात. कोणतीही सत्ता अमर नसते ती एक ना एक दिवस संपुष्टात येत असते,म्हणून कोणत्याही पदाचा वापर विनाकारण कोणाची जिरवण्यासाठी करू नये पद,प्रतिष्ठा,सत्ता याचा वापर बँक आणि जनहितासाठी करावा.हल्ली सत्ता कशी मिळते आणि कशी मिळवली जाते हे जगजाहीर आहे .
सेवानिवृत्त अधिकारी श्री.देवराम झावरे हे एक चांगले अधिकारी असल्यामुळेच त्यांच्या सेवा पूर्ती समारंभास सर्व स्तरातून शुभेच्छा देणारा जनसमुदाय उपस्थित आहे,ही त्यांनी केलेल्या कामाची पोहोच पावती आहे.