इतर
सेवानिवृत्त केंद्रीय पासपोर्ट अधिकारी एकनाथ पन्हाळे यांचे निधन

अकोले, ता.१३: प्रतिनिधी
अकोले येथील रहिवासी पासपोर्ट अधिकारी एकनाथ गणपत पन्हाळे वय ६६यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.मुंबई, दिल्ली,पुणे या ठिकाणी केंद्रीय पासपोर्ट अधिकारी म्हणून त्यांनी आपली सेवा केली.ग्रामीण भागातील व परदेशात जाणाऱ्या सर्वसामान्य व्यक्ती,विद्यार्थी यांना पासपोर्ट काढण्यात अडचणी येऊ नये म्हणून मार्गदर्शकाची भूमिका बजवणारे एकनाथ पन्हाळे यांच्या निधनाने राजूर,अकोले,येथे हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या मागे पत्नी,भाऊ,बहीण, २मुले,भाचे,असा मोठा परिवार आहे.वडाळा येथील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांची प्राण ज्योत मावळली.सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. राजूर येथील पत्रकार शांताराम काळे यांचे ते मेहुणे होत
————–