माझा घरचा सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा – हर्षदाताई काकडे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव- नेवासा राजमार्गावरील भायगाव येथे सुरू असलेल्या ५५ व्या अखंड हरिनाम सप्ताह च्या सांगता प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख अॅड शिवाजीराव काकडे,यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.घरात मिळालेला सन्मान हा सर्वश्रेष्ठ असतो व तो समाजसेवेची ऊर्जा देतो त्यामुळे हा सन्मान अभिमानास्पद आहे.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला व बालविकास तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार सोहळ्या ग्रामपंचायत लोकनि बालकल्याण सभापती असताना मी ग्रामीण भागातील महिलांना व तालुक्याला न्याय देण्याचे काम केले आहे. महिलांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम केले आहे. यापुढेही महिलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करा त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचे काम पूर्ण ताकदीने करेल.यावेळी विष्णू महाराज दुकळे गहिनीनाथ महाराज आढाव हरिभाऊ महाराज अकोलकर भायगाव ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच सो मनीषाताई आढाव युवा नेते राजेंद्र आढाव, माजी चेअरमन जनार्दन लांडे, सदाशिव शेकडे, हरिचंद्र आढाव कैलास लांडे, केशव आढाव, माजी सरपंच संजय लांडे, रामनाथ आढाव, आदिनाथ लांडे, सोपान लांडे, नारायण आढाव,विठ्ठल प्रल्हाद आढाव, सुदाम खंडागळे, अशोक गेणु दुकळे,अण्णासाहेब ज-हाड, डॉ.विजय खेडकर, आप्पासाहेब दुकळे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह भायगाव व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नवनाथ बाबांच्या महा भंडाऱ्याचे आयोजन
शेवगाव -पाथर्डी जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांच्या वतीने २७/५/२०२३ रोजी नवनाथ बाबाच्या महा भंडाऱ्याचे आयोजित केला असल्याचे यावेळी काकडे कुटुंबीयांनी जाहीर केले.