चापडगाव विद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

.
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
चापडगाव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मंदाकिनी खंडागळे होत्या.
यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना श्रीम.खंडागळे म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जातिवाद, जातीभेद,अस्पृश्यता अनुभवली होती. भीमरावांना उच्च शिक्षण मिळवून देण्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड व राजश्री शाहू महाराज यांची मदत मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये समानता व समान हक्क मिळण्यासाठी चवदार तळे सत्याग्रह व काळाराम मंदिर सत्याग्रह केला. त्यांच्या क्रांतीमुळे मी या ठिकाणी उपस्थित आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी बोलताना प्रभाकर मराठे म्हणाले की, डॉ. आंबेडकराचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते. त्यांनी केलेला संघर्ष, समाजकार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी पाटबंधारे मंत्री असताना नदीजोड प्रकल्प या विषयी आपले विचार मांडले होते त्यांनी दिन दलितांच्या उद्धारासाठी व त्यांच्या उत्थानासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांनी मूकनायक, समता, प्रबुद्धभारत या वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनजागृती घडून आणली असे सांगितले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. गणपत शेलार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य त्यांनी दिलेला मूलमंत्र ” शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विषयी माहिती दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा महासागर होते. जगातील सर्वच देशांमध्ये डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते त्यांचे कार्य संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे. संविधान निर्मिती करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीय जनतेवर उपकार केले आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज जागृतीसाठी केला. आपणही डॉ.आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी होते. त्यांची प्रेरणा आपण घेतली पाहिजे असे उद्गार या प्रसंगी काढले.
यावेळी विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दादासाहेब ज्योतीक यांनी सूत्रसंचालन शिवाजी कोल्हे यांनी तर आभार श्रीमती शितल दहिवाळकर यांनी मांनले.