राजापूर महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

संगमनेर-प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय राजापूर येथे दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी प्रागतिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिल गोडसे ,संचालक श्री भारत शेलकर ,स्कूल कमिटी चेअरमन भाऊसाहेब हासे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष कडलग सर यांनी केले .त्यांनी वाचन आणि शिक्षण किती महत्वाचे आहे याचे विविध दाखले देऊन प्रबोधन केले .त्याचबरोबर शिक्षकांची भूमिका यावर अमूल्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाऊसाहेब हासे यांनी भूषविले .याप्रसंगी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देत उपस्थित सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गोफने यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ.प्रवीण आहेर यांनी केले.महाविद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला.