महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांचा इशारा

दत्ता ठुबे
पारनेर:-सूपा एमआयडीसी मध्ये गणराज इंपैक्ट प्राइवेट लिमिटेड ही कंपनी वाघुंडे खु. हद्दीत रस्त्यालगत आहे. या कंपनीचा धूर खूप घातक आहे.त्या धुरातून खूप घातक बर अणि त्याची खाक येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यातील प्रवाशी आणि शेजारील हॉटेल वरील अन्नावर बसते अणि हे अन्न खाल्यावर शरीरावर घातक परिणाम होतो. कंपनीच्या बाजूला रोडच्या लगत शेती असल्याने शेतकऱ्यांच्या शेती मालावर व फळबागांवर त्या धुराची खाक व बर बसते व त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके आणि फळबागाची नुकसान होते. सदर कंपनी ही नगर पुणे रस्त्यालगत असल्यामुळे प्रवाशांचे व तेथील व्यावसायिकांचे खूप नुकसान होत आहे. सदर कंपनी ही कंपनीचा घातक धूर रात्री हवेत सोडतात.
सदर कंपनी ही रस्त्यालगत न राहता ही कंपनी आऊट साइडला स्थलांतरित करावी जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना त्याचा त्रास होता कामा नये. त्यांच्यावर आपण काय उपाय योजना केली असेल तर आम्हाला एक महिन्यात कळावे, नाहीतर आम्ही प्रादेशिक अधिकारी कार्यालय येथे तक्रार दाखल करू किंवा न्यायालयीन मार्ग अवलंबू असा इशारा रवीश रासकर यांनी दिला.