प्रकाश साळवे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार !

अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत दिला जाणारा सन २०२२-२३ चा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार अकोले येथील प्रकाश सखाराम साळवे यांना प्रदान करण्यात आला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस ना.अजितदादा पवार,क्रीडामंत्री संजय बनसोडे, माजी समाज कल्याण राज्यमंत्री संजय सावकारे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सचिव सुमंत भांगे,आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत
मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मींग आर्टस,( NCPA) जमशेद भाभा नाटयगृह, नरीमन पॉइंट, मुंबई येथे दिनांक 12 मार्च 2024 रोजी सपत्नीक त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
प्रकाश साळवे यांनी दलित, वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार दिला या पूर्वी 2013 साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार मिळाला होता. अनेक सामाजिक संस्थेने त्यांच्या अकोले तालुक्यातील व शहरातील अनेक सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाचा हा साहित्य रत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रकाश साळवे यांचे अकोले तालुक्यातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.