विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक .सौ. शालिनीताई विखे पाटील .

अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
दत्ता ठुबे
पारनेर – सहकाराचे प्रतीक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषी , आरोग्य, शिक्षण, पाणी , सामाजिक , सहकार , राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले. पद्मश्रींच्याच पावलावर पाऊल ठेवत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी संपूर्ण हयातभर कार्य केले. ‘ ‘देह वेचावा कारणी’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी आपली संपुर्ण जीवनयात्रेचे वर्णन केले आहे , ती आपण प्रत्येकाने वाचावयास हवी. या राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेद्वारे अनेक स्पर्धकांनी त्यांच्यावर विविधांगी प्रकाश टाकला. विखे पाटील परिवार पद्मश्री व पद्मभूषण विखे पाटील यांच्या कार्याचा व वारकरी संप्रदायाच्या विचारांचा पाईक आहे , असे प्रतिपादन अहिल्यानगर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पद्मभूषण लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अळकुटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व वडनेर ब्रुदूक येथील सहकारमहर्षी बाळासाहेब बाबर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती दिनानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी हे होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुंदा कवडे यांनी आपल्या प्रास्ताविकाद्वारे महाविद्यालयाचा इतिहास व स्पर्धेची प्रासंगिकता कथन केली. पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर यांनी स्पर्धा सुरू करण्याबाबतची भूमिका व आवश्यकता कथन केली. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य भाऊसाहेब डेरे पाटील यांनी भविष्यकाळात बीबीए, बीसीए, बीसीएस आणि इतर व्यावसायिक कोर्स महाविद्यालयात सुरू करावेत अशी मागणी याप्रसंगी केली.

या स्पर्धेत राज्यभरातून ७० पेक्षा जास्त स्पर्धकांनी यशस्वीरित्या सहभाग नोंदविला. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी नवघणे विशाखा जालिंदर , आय.बी.एम.ए. पायरेन्स कॉलेज, लोणी प्रवरा, द्वितीय क्रमांक कुमारी टाकळकर समृद्धी महेंद्र , बी.जे. कॉलेज आळे, तृतीय क्रमांक कुमारी शेख मुस्कान , मैनोदीन ए.सी.एस. महाविद्यालय , अळकुटी, उत्तेजनार्थ कुमारी काळे श्रद्धा बापूसाहेब , रा. नारायणराव बोरावके महाविद्यालय , श्रीरामपूर व गजरे सायली राजाराम , ए.सी.एस. महाविद्यालय , अळकुटी यांनी पटकविला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी गिधाड संध्या विष्णू पी.व्ही.पी. महाविद्यालय , प्रवरानगर, द्वितीय क्रमांक कुमारी पाडेकर दुर्गा राजेश , सीताबाई रंगुजी शिंदे महाविद्यालय , बोरी बु., तृतीय क्रमांक कु. घाटपांडे साईराज मोहन , श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय , पुणे , उत्तेजनार्थ कुमारी कोल्हे उत्कर्षा बंडू , श्री ओंकारनाथ मालपाणी महाविद्यालय , संगमनेर व कु. वनारे अनिकेत रामा संताजी , महाविद्यालय , नागपूर यांनी पारितोषिके पटकाविली.
याप्रसंगी प्रा.डॉ. शांताराम चौधरी व प्रा. दशरथ खेमनर यांनी उत्तमरित्या परीक्षक म्हणून काम पाहिले. तर निघोज येथील स्वप्नील तनपुरे या युवा लेखकाने १०२ पेक्षा जास्त लेखन व प्रकाशन करत देशात पहिला क्रमांक व जगात तिसरा क्रमांक संपादन करत , लौकिक संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल प्रवरा संस्थेच्या वतीने अळकुटी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुंदा कवडे व सहकारमहर्षी बाळासाहेब बाबर सार्वजनिक वाचनालया चे संस्थापक अध्यक्ष तथा सदस्य पंचायत समिती दिनेश बाबर यांचाही सन्मान चिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
नुकताच दि .६ जानेवारी रोजी झालेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत ” पत्रकार दिना ” निमित्त पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह , भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील , तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवणे , सोमनाथ गोपाळे, सचिन जाधव, भास्कर कवाद, सौ. निलम खोसे पाटील, मंगेश पारखे, अमोल खिलारी, विकास शेंडकर, दिपक वरखडे, बाबाजी वाघमारे, प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल आणि इतरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला पोपटराव गागरे, अशोक गुंजाळ, अशोक घोडके, खंडू म्हस्के, डॉ . म्हस्के , उमेश पुंडे, उपप्राचार्य प्रा. अमोल नालकर, प्रा. अर्जुन चाटे, प्रा. विशाल रोकडे, प्रा. संजय जाधव, प्रा. तांबे , प्रा.दत्तात्रय शेळके, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, प्रा. सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. स्वाती फापाळे, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा. शिवाजी शेळके, प्रा. मच्छिंद्र बेलोटे, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. सचिन बलसाने, प्रा. सुप्रिया पारखे, प्रा. ऋषिकेश गीते , प्रा. पूजा वैरागर, प्रा. पांडुरंग उघडे, डॉ. शांता थोरात, प्रा. रावसाहेब झावरे, प्रा. संदीप गेटम, प्रा. अनुराधा गाढवे, प्रा. मोहन माने, प्रा. राजाराम गोर्डे, कार्यालय अधीक्षक गोरख घोलप, लेखापाल सूर्यमाला भोर, सुनिता भालेराव, नितीन घोलप, विकास सोनवणे, छाया म्हस्के, राहुल बोरुडे, सागर शितोळे, मनोहर कनिंगध्वज, मच्छिन्द्र म्हस्कुले, वैजनाथ आवारी, रवींद्र वाघ, पांडुरंग शिरोळे, शिवाजी कळंबे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. कुंदा कवडे, सूत्रसंचालन प्रा. स्वाती फापाळे व प्रा.विशाल रोकडे तर आभार प्रा.पूजा वैरागर यांनी मानले.