औटी-लंकेची युती पारनेर तालुक्यातील जनतेचा विश्वासघात~अविनाश पवार

नगरच्या उड्डाण पुलाच्या यशाच्या पोटदुखीतुन लंके -औटी यांची युती~ पवार
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती च्या औटी-लंके मनोमिलना वर मनसे चे अविनाश पवार यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली
पारनेर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांचा विश्वास घात केला आहे सर्व सामान्य कार्यकर्ता गृहीत धरून सत्ता, पैसा आणि पद,प्रतिष्ठा, खुर्ची साठी पारनेर तालुक्यातील जनतेचा विश्वास घात केला असल्याचा गंभीर आरोप मनसे नेते अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला पुढे बोलताना पवार यांनी सांगितले की आम्ही या आधीही स्पष्ट सांगितले होते की पारनेर तालुक्यातील ह्या नेते मंडळीच एक मेका सोबत झिंगाट चालु आहे त्यामुळे स्वतः च्या स्वार्थासाठी यांच साट-लोट जोरात चालू आहे प्रत्येक जण आपापल्या परीने सेटलमेंट करत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आप-आपले उद्योग धंदे जोरात चालू करत आहे सर्व सामान्य जनतेच्या भावनेशी खेळुन पारनेर तालुक्याच्या सध्याच्या राजकारणात सर्व सामान्य कार्यकर्ते यांना विश्वासात घेतले जात नाही सर्व सामान्य कार्यकर्ता गृहीत धरून चांगल्या विचार धारेच्या लोकांन सोबत यांच्या आर्थिक साट- लोट मुळे गलिच्छ राज कारण करुन नवीन उमद्या तरुणांना टार्गट करत हे नेते मंडळी विना कारन ञास देत राजकीय बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला पण पारनेर ची जनता यांना ओळखुन आहे त्यामुळे नक्कीच नविन पर्याय शोधत भविष्यात यांना यांची जागा दाखवणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या विचार धारेशी सहमत असणार्या मतदारान सोबत चर्चा करून लवकरच बाजार समिती मध्ये आपली भुमिका स्पष्ट करणार असल्याचे पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.