इतर

सिन्नर फोटोग्राफर व साई कॅमेरा स्टोअर वतीने कार्य शाळा उत्सवात संपन्न

विलास तुपे
सिन्नर दि 13

साई कॅमेरा स्टोअर सिन्नर आयोजित लाइव्ह डेमो आणि वर्कशॉप या कार्यक्रम झाला त्याला जवळ पास 2700 फोटोग्राफर मित्रांनी उपस्थित दाखवली हा कार्यक्रम फक्त फोटोग्राफर मित्रांची ज्ञानवृद्धी होण्यासाठीच होता सदरील कार्यक्रमाचे सकाळी 10 वाजता श्री नवनाथ घुगे व सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेने फित कापून उदघाटन केले .

व्यसपीठावर प्रमुख उपस्तीत अहमदाबाद येथील मेंटोर श्री दीपक वाघेला सर,श्री शशी राणे सर,नाशिक संघटनेचे श्री संजय जगंताप महाराष्ट्र महासंघाचे अभय कापरे व सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष रामहरी वरूनगसे संदीप दातखिळे यांनी दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरवात केली
साई कॅमेरा स्टोअर सिन्नर च्या वतीने विविध कंपनीचे स्टोल लावण्यात आले होते
सदरील कार्यक्रमा खूप मोठ्या प्रमाणात फोटोग्राफर मित्रांचा प्रतिसाद मिळाला संपूर्ण उत्तर महाराष्ट्र सह अकोले,संगमनेर, येथील मोठे प्रमाणात फोटो ग्राफर उपस्थित होते आणि सिन्नर परिसरातून फोटोग्राफर मित्र उपस्थित होते
सर्व उपस्थित फोटोग्राफर जे जवळ पास 2700 च्या वर संख्येने उपस्तीत होते त्यांचे तसेच सर्व फोटोग्राफर संघटनांचे
साई स्टोअर मालक योगेश घुगे यांनी जाहीर आभार मानले फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून जो कार्यक्रम घडवून आणला तो खूपच अविस्मरणीय आहे . यातून एक सिन्नर तालुक्यातील फोटोग्राफर चे असलेले मजबूत संघटन बघण्यास मिळाले
या वर्कशॉप साठी नासिक तसेच उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच संघटना उपस्थित होत्या. त्या संघटनांचे मनापासून स्वागत करून त्यांचा सत्कारही केला.
सिन्नर संघटनेने घेतलेल्या वर्कशॉप मधून बरेचसे फोटोग्राफर बंधूंना अंधारातून प्रकाशकडे निघाल्यासारखे वाटेल. काळानुसार आपणही बदलले पाहिजे , आपल्या होत असलेल्या चुकांचा खुलासा करून दिला तसेच आपल्या बिजनेस मधून सॅटिस्फाइड उत्पन्न मिळवावे यासाठी खूपच मोलाचे मार्गदर्शन हे दोन्हीही मेंटोरांनी दिले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button